चिंताजनक | दक्षिण आफ्रिकेत धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हेरियंटची भारतात एन्ट्री

चिंताजनक | दक्षिण आफ्रिकेत धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हेरियंची भारतात एन्ट्री

मुंबई :  कोरोनासंदर्भात चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेत धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हेरियंटनं आता भारतात एन्ट्री केली आहे.

भारतात कोरोनाच्या नव्या 2 व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. अशावेळी नेमकी काय काळजी घ्यावी, हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

नव्या कोरोनाला कसा घालणार आळा?

भारतामध्ये कोरोनाच्या BA.4 आणि BA.5 व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. धोकादायक ओमायक्रॉनचेच हे उप प्रकार आहेत. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या या व्हेरियंटनी चांगलाच धुमाकूळ घातला होता.

आता तामिळनाडूत या व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळलाय. तर त्यापाठोपाठ तेलंगणामध्येही दुसरा रुग्ण आढळला. इंडियन सार्स कोव्ह-२ जिनोमिक्स कंसोर्टियम अर्थात INSACOG या संस्थेनं याला पुष्टी दिली आहे.

BA.4 व्हेरियंटबाबात थोडक्यात

कोरोनाच्या BA.4 व्हेरियंटचा पहिला रुग्ण द.आफ्रिकेमध्ये आढळला होता. त्यानंतर हा व्हेरिअंट हळूहळू जगभरातील अनेक देशांमध्ये पसरला. या व्हेरियंटमुळं रुग्णाच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळं याचा धोका अधिक असल्याचं सांगितलं जातंय.

कोरोनाच्या या नव्या व्हेरिअंटचा प्रतिकार करायचा असेल तर बुस्टर डोस घेणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. लसीकरणामुळं आजमितीला राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आहे.

राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार नाहीय. त्यामुळं काळजीचं कारण नाही. पण कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.