Maharashtra Latest Corona Update | महाराष्ट्रात सलग चौथ्या दिवशी कोरोनाचे रुग्ण हजारांच्या पुढे; चौथ्या लाटेची सुरुवात तर नाही?

Maharashtra Latest Corona Update

Maharashtra Latest Corona Update | मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातले आहे. सलग चौथ्या दिवशी हजारो कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्याच्या आरोग्य यंत्रणेला पुन्हा सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आज राज्यात 1357 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 595 रुग्ण बरे झाले आहेत.

आज 1 रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील कोरोना मृत्यूचे प्रमाण 1.87 टक्के आहे. बरा होण्याचे प्रमाण 98.05 टक्के आहे.

राज्यात आज 5888 सक्रिय रुग्ण आहेत. काही महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण कमी होत होते. मात्र आता पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मास्क घालण्याचे आवाहन केले आहे.

राज्याच्या आरोग्य यंत्रणेला पुन्हा सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

मुंबईत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने रुग्णालये, जंबो कोविड सेंटर यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यात आतापर्यंत 8,10,35,276 नमुने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 78,90,346 नमुने कोरोनासाठी पॉझिटिव्ह आले आहेत.

आज राज्यात 1357 रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता 78,91,703 झाली आहे.

राज्य रुग्णांची आकडेवारी

मुंबई विभागात ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर, मीरा भाईंदर, पालघर, वसई विरार, रायगड, पनवेल यांचा समावेश आहे. या विभागात 1227 नवीन रुग्णांची (कोरोना) नोंद झाली आहे.

नाशिक विभाग – यामध्ये नाशिक, नाशिक एमसी, मालेगाव एमसी, अहमदनगर, अहमदनगर एमसी, धुळे, धुळे एमसी, जळगाव, जळगाव एमसी, नंदुरबार या वॉर्डात 4 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

पुणे विभागात- त्यात पुणे, पीएमसी, पीसीएमसी, सोलापूर, सोलापूर एमसी, सातारा यांचा समावेश आहे. या विभागात 104 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

कोल्हापूर विभाग- कोल्हापूर, कोल्हापूर एमसी, सांगली, सांगली एमसी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांचा या विभागात समावेश असून, या विभागात आज 7 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

औरंगाबाद विभाग- औरंगाबाद, औरंगाबाद एमसी, जालना, हिंगोली, परभणी, परभणी एमसी जिल्ह्यांचा या विभागात समावेश असून, या विभागात ३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

लातूर विभाग- लातूर, लातूर एमसी, उस्मानाबाद, बीड, नांदेड, नांदेड एमसी जिल्ह्यांचा समावेश असून, या विभागात 3 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

अकोला विभाग- अकोला, अकोला एमसी, अमरावती, अमरावती एमसी, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांचा या विभागात समावेश असून, या विभागात 2 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

नागपूर विभाग- नागपूर, नागपूर एमसी, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, चंद्रपूर एमसी, गडचिरोली या जिल्ह्यांचा या विभागात समावेश करण्यात आला असून, या विभागात ७ नवीन रुग्णांची (कोरोना) नोंद झाली आहे.