Corona News Update| मुंबई : सर्वांसाठी ही चिंताजनक बातमी आहे. सगळ्यांना ज्याची भीती वाटत होती तेच झालं. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार कोरोनाची चौथी लाट सुरू झाली आहे. WHO ने इशारा दिला आहे की, कोरोनाची नवी लाट सुरू झाली आहे.
ओमायक्रॉनची सबव्हेरियंट वेगाने विस्तारत असल्याचेही डब्ल्यूएचओने नमूद केले आहे. BA.4 आणि BA.5 प्रकार महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात वेगाने पसरत आहेत, असा इशारा WHO चे मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी दिला आहे.
ही चौथ्या लहरीची सुरुवात आहे. दर चार ते सहा महिन्यांनी कोरोनाच्या लहान लाटा अपेक्षित आहेत. दरम्यान, राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
मुंबईतही सर्वाधिक रुग्ण आहेत. शुक्रवारच्या आकडेवारीनुसार, राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 13,000 च्या पुढे गेली आहे.
यामुळे सामान्य जनता, नोकरशाही आणि प्रशासनात चिंता वाढली आहे. त्यामुळे राज्य सरकार लवकरच काही निर्बंध लादू शकते.
राज्यातील कोरोनाची दैनंदिन आकडेवारी
- शुक्रवार 10 जून : 3 हजार 81
- गुरुवार 9 जून : 2 हजार 813
- बुधवार 8 जून : 2 हजार 701
- मंगळवार 7 जून : 1 हजार 881
- सोमवार 6 जून : 1 हजार 36
- रविवार 5 जून : 1 हजार 494
- शनिवार 4 जून : 1 हजार 357
- शुक्रवार 3 जून : 1 हजार 134
- गुरुवार 2 जून : 1 हजार 45
- बुधवार 1 जून : 1 हजार 81