Omicron Subvariant BF.7: कोरोनाचा चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या वेरिएंटचे 3 रुग्ण भारतातही आढळले

ओमिक्रॉन सबवेरियंट BF.7

Omicron Subvariant BF.7: कोरोनाचा ज्या प्रकाराने चीनमध्ये कहर केला आहे, त्याची तीन प्रकरणे भारतातही समोर आली आहेत. त्यामुळेच सरकारने ही बाब गांभीर्याने घेत तयारी वेगाने सुरु केली आहे. याबाबत दिल्लीत बैठकही झाली आहे.

पीटीआयच्या म्हणण्यानुसार, अधिकृत सूत्रांनी बुधवारी सांगितले की, भारतात आतापर्यंत ओमिक्रॉन सबवेरियंट BF.7 ची तीन प्रकरणे आढळून आली आहेत.

ऑक्टोबरमध्ये गुजरातमध्ये BF.7 चे पहिले प्रकरण आढळून आले. आतापर्यंत गुजरातमध्ये दोन तर ओडिशातून एक प्रकरण समोर आले आहे.

चीन मध्ये तांडव

Omicron subvariant BF.7 ने चीनच्या अनेक शहरांमध्ये कहर केला आहे, ते एकामागून एक लोकांना आपल्या तावडीत घेतले आहे. आता पर्यंत या व्हेरीअंट मुळे डझनभर लोकांचा मृत्यू झाला आहे. Omicron सबवेरियंट BF.7 मुळे चीनमध्ये कोरोनाच्या बाबतीत तेजी आली आहे, असे सांगितले जात आहे.

या देशांमध्ये धुमाकूळ

BF.7 हे Omicron मधील BA.5 चे उप-प्रकार आहे. त्यात संसर्ग होण्याची उच्च क्षमता आहे. त्याचा उष्मायन काळ लहान असतो.

हे लसीकरण झालेल्या लोकांना देखील संक्रमित करू शकते. चीनपूर्वी, Omicron subvariant BF.7 ने यूएस, यूके, बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स आणि डेन्मार्कसह अनेक देशांमध्ये आधीच कहर केला आहे.

ऑक्टोबरमध्ये यूएसमध्ये 5% पेक्षा जास्त प्रकरणे BF.7 ची होती. तर UK मध्ये, 7.26% प्रकरणे BF.7 चे होते. भारत सरकार या प्रकरणी आधीच सावध दिसत आहे.

आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखाली या संदर्भात दिल्लीत बैठक झाली असून, त्यामध्ये तयारीचा आढावा घेण्यात आला आहे.