MLC Election Result : फडणवीसांची जादू कायम, भाजपचे पाचही उमेदवार विजयी

fadnavis-uddhav

मुंबई, 20 जून : विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांची योजना यशस्वी झाली असून भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत.

श्रीकांत भारतीय, राम शिंदे, प्रवीण दरेकर, उमा खापरे आणि प्रसाद लाड हे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे, शिवसेनेच्या आमशा पाडवी, काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे, शिवसेनेचे सचिन अहिर हे पाच उमेदवार विजयी झाले आहेत, तर काँग्रेसचे भाई जगताप यांना अपयशाला सामोरे जावे लागले. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमने हा चमत्कार केल्याचे बोलले जात आहे.

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात असल्याने कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येणार याची उत्सुकता होती.

देवेंद्र फडणवीस का महाराष्ट्र की सत्ता का सफ़र और चुनौतियाँ - BBC News हिंदी

राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी चमत्कार करून भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी केले. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला.

त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली होती. त्यांनी सर्व आमदारांना आपल्या देखरेखीखाली ठेवले होते.

मतदानाच्या दिवशीही मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांशी चर्चा करून त्यांना मतदानासाठी पाठवले होते. यावेळी शिवसेनेला दगाफटका नको म्हणून आपल्याच आमदारांच्या बळावर आपला उमेदवार विजयी करण्यावर भर दिला होता.

Also Read