शिवसेनेचे टेन्शन वाढले, एकनाथ शिंदेनंतर आणखी ३ बडे नेते नॉट रिचेबल

64

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल काल जाहीर झाला आहे. यात भाजपाने मुंसडी मारली आहे. राज्यसभेतील यशानंतर पुन्हा एकदा भाजप नेत्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

दरम्यान, या निकालानंतर आता महाविकास आघाडीत धुसफूस बाहेर येऊ लागली आहे. निकालानंतर एकनाथ शिंदे यांचा गट नाराज असल्याची चर्चा आहे.

त्यामुळे कालपासून त्यांचा फोन नॉट रिचेबल आहे. या बातमीनंतर आता पुन्हा एकदा शिवसेनेचे टेन्शन अजुन वाढले आहे.

एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे तीनही आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळत आहे.

म्हाडचे आमदार भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे या तिन्ही नेत्यांचे फोन बंद आहेत.

तिघांचेही फोन लागत नसल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. यामुळे सेनेच्या समोर आता पुन्हा एकदा पेच निर्माण झाला आहे.

दरम्यान, राज्यसभेत भाजपा १२३ मतं मिळाली होती. मात्र विधानपरिषदेला १३३ मतं मिळाल्याने काँग्रेस आणि शिवसेनेची मतं फुटल्याचं समोर आलं आहे.

महाविकास आघाडीची एकूण २१ मतं आणि शिवसेनेच्या गोटातील दहा मतांचा सौदा झाल्याची चर्चा आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माघारी मतदारसंघात निघालेल्या आमदारांना पुन्हा मुंबईत बोलावलं आहे. शिवसेनेतर्फे तातडीने बैठक बोलवण्यात आली आहे.

मात्र नाराज असलेले शिवसेना नेते आजच्या बैठकीला उपस्थित राहतात की नाही, याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे.