MLC Election : काँग्रेसमध्ये कोणीतीही नाराजी नाही, अपक्षांची मते आम्हाला मिळणार : नाना पटोले

MLC Election

MLC Election : काँग्रेसमध्ये कोणी नाराज नाही. आम्ही अपक्ष आणि छोट्या पक्षांसोबत असल्याने त्यांची मते आम्हाला मिळतील. आमचे सर्व उमेदवार निवडून येतील.

काँग्रेसच्या अन्य उमेदवारालाही मते मिळतील. आमदारांशी चर्चा केली आहे, त्यांची नाराजी दूर झाली आहे. यावेळी कोणतीही दगाबाजी होणार नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

काँग्रेसच्या ४४ आमदारांचे मतदान पूर्ण ४४ काँग्रेस आमदारांनी मतदान पूर्ण केले. त्यामुळे काँग्रेसचे नेते पक्ष कार्यालयात मतांची जुळवाजुळव करताना दिसत आहेत.

दोन्ही काँग्रेसचे उमेदवार विजयी व्हावेत, यासाठी त्यांनी जबाबदारी पार पाडली का, अशी चर्चा काँग्रेस नेत्यांमध्ये सुरू आहे. आता सर्वांचे लक्ष निकालाकडे आहे.

दरम्यान, मतमोजणीच्या पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

आमदार मुक्ता टिळक यांचे देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले

कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी लढा देणाऱ्या कसबा पेठेतील आमदार मुक्ता टिळक यांचे विधानसभेच्या निवडणुकीत बहुमोल मतदान करण्यासाठी आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे उमेदवार राम शिंदे आणि प्रवीण दरेकर उपस्थित होते.

सहाही उमेदवार बहुमताने विजयी : नाना पटोले

आज विधान परिषदेची निवडणूक आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापली पराकाष्ठा केली आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला.

त्यानंतर महाराष्ट्र विधान परिषद निवडणूकित त्याची पुनरावृत्ती होणार का? अशी चर्चा रंगली आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केले आहे. महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार विजयी झाल्याने विरोधकांचा गर्व कमी होईल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.

आज भाजपचे सर्व उमेदवार निवडून येतील : राम कदम 

आघाडीचे तीन पक्ष, आमदारांमधील असंतोष आजच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. भाजपचे सर्व आमदार निवडून येतील.

भाजपसोबतच खऱ्या अर्थाने अपक्ष, तसेच काही आमदार आघाडीत आहेत. नाईलाजाने ते मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याने ते अजूनही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहेत, असे भाजप नेते राम कदम म्हणाले.

राज्यसभेने खूप काही शिकवले : रोहित पवार

राज्यसभेने खूप काही शिकवले. विरोधक कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे आमदारांवर दबाव येऊ शकतो. यावेळी आघाडीने सर्व काही सांभाळले आहे. गेल्या वेळी एक मत बाद झाल्याने सर्व काही बदलले.

यावेळी वैयक्तिक मतांची काळजी घेण्यात आली आहे. भाजप मोठ्या आत्मविश्वासाने बोलत आहे. त्यांच्याकडे संख्या नाही. भाजपासाठी वातावरण निर्माण करण्याची त्यांची रणनीती आहे.

आमच्यात आत्मविश्वास आहे, अतिआत्मविश्वास नाही. थोडे नाराज असले तरी बहुतांश ठिकाणी त्यांनी आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे निकाल पहा आणि ठरवा, असे रोहित पवार म्हणाले.