Actress Ketki Chitale । छोट्या पडद्यावरील अभिनेत्री केतकी चितळे (Actress Ketki Chitale) पुन्हा एकदा वादात सापडली आहे. केतकी चितळे यांनी शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करत लिहिलेली पोस्ट शेअर केली आहे.
याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केतकी चितळे हिने तिच्या फेसबुक अकाऊंटवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्याविरोधात वादग्रस्त कविता पोस्ट केली आहे. तिच्याविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आक्षेपार्ह भाषेतील या पोस्टमुळे केतकी चितळेवर आता टीका होत आहे. या कवितेत शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करण्यात आली आहे.
यानंतर राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील नेटके यांच्यासह कार्यकर्त्यांनी तिच्याविरोधात कळवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात ट्विटरवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी निखिल भामरे या ट्विटर युजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंद परांजपे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, निखील भामरे या व्यक्तिने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला आहे.
“वेळ आली आहे बारामतीच्या “गांधी”साठी… बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची” असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.
या ट्विटनुसार शरद पवार यांना मारण्याचा आणि समाजात अशांतता निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार धमकी तसेच चिथावणी दिल्याप्रकरणी हा गुन्हा नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
#Actress Ketki Chitale #NCP President Sharad Pawar