रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर हे पंतप्रधान मोदींचे गुलाम; नितीन राऊत यांची टीका

150
Nitin Raut, Criticism of Prakash Ambedkar and Ramdas Athavale

जळगाव : देशात दलितांची भीती नाही. लोकशाहीचे चार स्तंभ हलवण्याचे धाडस केंद्र सरकार करत आहे. मात्र, याविरोधात बोलायला एकही नेता पुढे आला नाही.

ज्यांनी बोलायला हवे होते ते मोदींचे गुलाम झाले आहेत, असे म्हणत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर सडकून टीका केली आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सुरवाडे यांच्या हस्ते भुसावळ शहरात प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या भीम गीताचा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाला राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत उपस्थित होते. यावेळी मंत्री नितीन राऊत यांनी भीम गीताचा आस्वाद घेतला.

ओवेसींच्या औरंगजेब कबर भेटीमुळे महाराष्ट्रात वाद | याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर आम्ही शिवरायांचे मावळे नाही : नितेश राणे

यावेळी बोलताना मंत्री नितीन राऊत यांनी सध्या सुरू असलेल्या राजकारणावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेनुसार लोकशाहीचे चार स्तंभ असल्याने त्यांना हलवण्याचे काम सध्या केंद्र सरकारकडून सुरू आहे.

मात्र, यावर बोलण्यासाठी एकही नेता पुढे आला नाही. दलित तसेच आंबेडकरी समाजाकडे दुर्लक्ष केले जात आहे. स्वतःला आंबेडकरी समाजाचे प्रतिनिधी समजणारे मोदी यांचे गुलाम झाले आहेत.

त्यांच्या नावात राम आहे पण ते गुलाम आहेत, अशा शब्दांत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.

दुसरीकडे नावात प्रकाश आहे पण त्याला ऊर्जा आंबेडकरांकडून मिळाली, असल्याची टीका राऊत यांनी केली आहे.

हे देखील वाचा