5G Network | 5G च्या स्पीडची चाचणी करताना काही सेकंदात डेटा संपला, काय आहे कारण? जाणून घ्या!

    5G speed test ran out of data in seconds, why? Find out!

    5G Network : सध्या देशात काही ठिकाणी 5G नेटवर्क सुरू करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आता सर्वसामान्य लोक त्यांच्या फोनमध्ये 5G नेटवर्क मिळण्याची वाट पाहत आहेत.

    5G नेटवर्कच्या आगमनाने, काही लोकांनी 4G (4G नेटवर्क) आणि 5G स्पीडमधील फरक पाहण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यानंतर घडलेल्या प्रकाराने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

    5G नेटवर्कच्या आगमनानंतर, मोबाइल वापरकर्ते त्याची स्पीड तपासण्यासाठी खूप उत्सुक आहेत. या उत्सुकतेपोटी अनेकांना नेटवर्क आजमावून पाहण्याच्या चांगलाच फटका बसला आहे.

    Crime News : आजोबांसह चुलत भावाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार, व्हिडिओ व्हायरल

     

    ज्यांनी 5G नेटवर्कची चाचणी करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी त्यांचे अनुभव ट्विटरवर शेअर केले आहेत. विविध कंपन्यांनी सुरू केलेल्या 4G आणि 5G सेवा मिळावी हि अपेक्षा आहे.

    ज्यांनी स्पीड टेस्ट आजमावून त्याचा आनंद घेण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे.

    त्यांचा निम्म्याहून अधिक डेटा फक्त चेक करताना संपला आहे. 5G नेटवर्क वापरल्यानंतर त्यांचा मोबाईल डेटा वेगाने संपत आहे. त्यामुळे या प्रकरणाची माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

    मोबाईल वापरकर्त्यांना 5G वर 1Gbps पर्यंत स्पीड मिळणे अपेक्षित असताना, भारतात सध्याचा 5G नेटवर्क स्पीड फक्त 500 ते 600Mbps आहे.

    5G च्या उच्च गतीमुळे डेटाचा वापरही अधिक होत आहे. तथापि, हा डेटा इतर कारणांमुळे लवकर संपण्याची शक्यता आहे.

    बरेच लोक त्यांच्या मोबाईलवर YouTube व्हिडिओ पाहतात. मात्र जेव्हा इंटरनेटचा वेग कमी असतो तेव्हा व्हिडिओची गुणवत्ता चांगली नसते.

    एकदा इंटरनेटचा स्पीड वाढला की त्यासाठी अधिक डेटाही वापरला जातो. त्यामुळे अशा स्थितीत तुम्ही 5G वर व्हिडिओ पाहिल्यास, उपलब्ध डेटा अतिशय वेगाने वापरला जातो.

    Jio आणि Airtel या दोन्ही कंपन्यांनी 5G सेवा सुरू केल्या आहेत. मात्र, त्यांच्यासाठी अद्याप कोणतीही वेगळी योजना जाहीर करण्यात आलेली नाही. पण Jio कंपनीने आपल्या यूजर्सना अनलिमिटेड 5G डेटा ऑफर केला आहे.

    त्याच वेळी, एअरटेल वापरकर्त्यांना विद्यमान डेटा प्लॅनवर 5G स्पीड मिळत आहे. तथापि, Jio ची सेवा इन्व्हाईट बेस्ड असल्याने, ती केवळ निवडक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध केली गेली आहे, तर Airtel ने तसे केलेले नाही.

    5G सेवा नेटवर्क कंपन्यांद्वारे वापरकर्त्यांना पुरविल्या जातात, परंतु तुम्हाला त्याचा डेटा मिळेल. मात्र या परिस्थितीतही 5G सेवा नेटवर्क वापरल्यास युजर्सचा डेटा झपाट्याने संपत आहे.

    हे देखील वाचा