ऋतूजा लटके यांना दिलासा तर महापालिकेला हायकोर्टाचा ‘फटका’

0
54
Relief to Rituja Latke, 'shocks' of High Court to Municipal Corporation

मुंबई : शिवाजी पार्क मैदानावरून आधीच पडलेल्या मुंबई महापालिकेला मुंबई उच्च न्यायालयाने दुसरा दणका दिला आहे.

ऋतुजा लटके यांचा राजीनामा उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत स्वीकारून याचिकाकर्त्यांना निर्णय कळवा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत.

त्यामुळे ऋतुजा लटके यांचा अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप, ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेतील नेत्यांवर गुन्हा दाखल

 

या जागेसाठी उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने ऋतुजा लटके यांना यावेळी मोठा दिलासा मिळाला आहे.

शिवसेनेच्या ऋतुजा लटके या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून उमेदवारी दाखल करणार आहेत. न्यायालयाच्या या निकालानंतर शिवसेना उद्धव गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.

रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभेची जागा रिक्त झाली होती. यानंतर शिवसेना उद्धव गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना पोटनिवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला.

मात्र ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेतील कर्मचारी होत्या ज्यांनी निवडणूक लढवण्यासाठी नोकरीचा राजीनामा दिला होता. मात्र तो मंजूर झाला नाही.

राजीनामा मंजूर होईपर्यंत त्यांना उमेदवारी अर्ज भरता आला नाही. अखेर ऋतुजा लटके यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

ऋतुजा लटके यांचा राजीनामा उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत स्वीकारण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

हे देखील वाचा