शिंदे गटाकडून शिवसेनेच्या नव्या नावाचे पोस्टर जाहीर; एकनाथ शिंदे यांचे लक्षवेधी ट्विट

Poster of Shiv Sena's new name announced by Shinde group; Eknath Shinde's eye-catching tweet

मुंबई : एकनाथ शिंदे गट शिंदे गट ढाल-तलवार घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहे. शिंदे गटाला (एकनाथ शिंदे) निवडणूक आयोगाने ढोल-तालावार चिन्ह दिले आहे.

शिंदे गटाकडून शिवसेनेच्या नवीन नाव आणि चिन्हाचे पोस्टर जाहीर करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या चिन्हाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले ट्विट लक्षवेधी ठरले आहे.

आम्हीच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्वाच्या विचारांचे खरे वारसदार….
सज्जनांच्या रक्षणासाठी बनूनी #ढाल, दुर्जनांच्या संहारासाठी हाती धरू #तलवार….
#बाळासाहेबांची_शिवसेना
निशाणी : #ढाल_तलवार
असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

आम्हाला मिळालेले ढाल तलवार चिन्ह आम्ही स्विकारतो. ढाल तलवार हे मराठमोळी आणि शिवाजी महाराजांचे प्रतिक आहे.

आमची शिवसेना बाळासाहेबांची आहे. त्या विचारांनी आपण पुढे जात आहोत. बाळासाहेबांची शिवसेना ही सर्व सामान्यांची शिवसेना असल्याचेही एकनाथ शिंदे म्हणाले.

शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव मिळाले आहे. तर, शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आले आहे.

सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या गटाला निवडणूक आयोगाकडून मशाल चिन्ह देण्यात आले. त्यामुळे ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे नाव पडले.

हे देखील वाचा