धनुष्यबाण ‘मोडला’ ही वस्तुस्थिती, ठाकरेंच्या काही चुका असतील : एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया

It is true that Dhanush 'broke', Thackeray must have done something wrong: 'Reaction

जळगाव: शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील राजकीय लढाईत निवडणूक आयोगाने चिन्ह आणि नाव तात्पुरते गोठवले आहे. आता नवीन चिन्ह आणि नाव मिळविण्यासाठी दोन्ही गट प्रयत्नशील आहेत.

राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी याप्रकरणी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचा धनुष्यबाण मोडला हे सत्य नाकारता येणार नाही, पण आता कोणाला दोष देण्यात अर्थ नाही. यात उद्धव ठाकरे यांच्याकडून काही चुका झाल्या असतील, अशी प्रतिक्रिया खडसेंनी दिली आहे.

काय म्हणाले एकनाथ खडसे?

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेचा धनुष्यबाण मोडला हे सत्य नाकारता येणार नाही, पण आता कोणाला दोष देण्यात अर्थ नाही. उद्धव ठाकरेंनी काही चुका निश्चित केल्या असतील.

Agniveer Bharti Rally : अग्निवीर भरती रॅलीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, त्यासाठी काय करावे? जाणून घ्या !

मात्र, चूक इतकी मोठी नसावी की त्यामुळे पक्षच संपावा, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

एकीकडे राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली असली तरी खडसेंनी वेगळी भूमिका घेत अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर ठाकरे गट काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शिवसेना आणि शिंदे गटाला कोणते चिन्ह मिळणार?

शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेली मुदत संपली आहे. दोन्ही गटांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे निवडणूक चिन्ह आणि नावांबाबत तीन पर्याय सुचवले आहेत.

शिवसेना आणि शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रस्तावांमध्ये तीनपैकी दोन निवडणूक चिन्हे एकच असल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे तिसरा पसंती क्रमांक देण्यात आलेल्या दोन्ही गटांच्या पर्यायांवर केंद्रीय निवडणूक आयोग विचार करत असल्याचे वृत्त आहे.

निवडणूक चिन्ह म्हणून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला मशाल तर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला गदा मिळण्याची शक्यता आहे.

शिवसेनेने त्रिशूल, उगवता सूर्य आणि तिसरी धगधगती अशी तीन चिन्हे पाठवली आहेत. शिवसेनेने शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची नावे निवडणूक आयोगाकडे पाठवली आहेत.

मात्र आता उगवता सूर्य आणि त्रिशूळ चिन्ह दोन्ही नाकारले जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग दोन्ही चिन्हे नाकारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

उगवता सूर्य आणि त्रिशूळ या दोन्ही प्रतीकांवरही शिंदे गटाने दावा केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे दोन्ही गटांनी एकाच वेळी एकाच चिन्हावर दावा केल्यास चिन्ह नाकारले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिंदे गटातूनही तीन नावे निश्चित झाली आहेत. बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना बाळासाहेब अशी 3 नावे निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील वाचा