Eknath Shinde Breaking : आता उदय सामंतही नॉट रीचेबल, सकाळपासून संपर्क नाही, गुवाहाटीला गेल्याची चर्चा

Uday Samant is also not reachable, no contact since morning, talk of going to Guwahati

मुंबई : शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडात आता राज्याचे आणखी एक मंत्री सामील झाल्याची शक्यता आहे.

राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत आज सकाळपासूनच संपर्कात नाहीत, ते संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेल्याने चर्चेला उधाण आले आहे.

कालच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला ते उपस्थित होते, मात्र आज सकाळपासून त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. एकनाथ शिंदे यांच्या गटात सध्या शिवसेनेचे 37 हून अधिक आमदार असून 9 हून अधिक अपक्ष आमदार आहेत.

आता उदय सामंत यांनी साथ दिल्यास बंडखोरांची ताकद वाढण्याची शक्यता आहे. उदय सामंत हे देखील विमानाने गुवाहाटी येथे पोहोचल्याचे कळते.

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे शिवसैनिक आणि शिवसेना नेत्यांना ऐक्याचे आवाहन करत असताना गळती थांबायला तयार नाही हेच दिसून येते.

संजय राऊत हे बंडखोर आमदारांवर कडाडून टीका करत आहेत, मात्र शिवसेनेचे अजून एक मंत्री गुवाहाटीला गेल्याच्या बातम्यांनी शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

कोण आहेत उदय सामंत 

उदय सामंत हे रत्नागिरीचे आमदार आहेत. ते सध्या शिवसेनेचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आहेत. त्यापूर्वी ते राष्ट्रवादीत होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

2004, 2009, 2014 आणि 2019 च्या चारही निवडणुका त्यांनी रत्नागिरीतून जिंकल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील युवा नेते म्हणून उदय सामंत यांच्याकडे पाहिले जाते.

शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे आता 39 आमदार आहेत

उदय सामंत यांच्या गुवाहाटी दौऱ्यामुळे शिंदेंसोबतच्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या आता 39 होणार. शिवसेनेचे आमदार कोण?

एकनाथ शिंदे, उदय सामंत, शहाजी पाटील, अब्दुल सत्तार, शंभुराज देसाई, अनिल बाबर, तानाजी सावंत, संदीपान भुमरे, चिमणराव पाटील, प्रकाश सुर्वे, भरत गोगावले, विश्वनाथ भोईर, शांताराम मोरे, संजय शिरसाट, गुलाबराव पाटील, प्रकाश आबिटकर, योगेश कदम, आशिष जयस्वाल, सदा सरवणक,र मंगेश कुडाळकर, दीपक केसरकर, यामिनि जाधव, लता सोनावणे, किशोरी पाटील, रमेश बोरणारे, सुहासे कांदे, बालाजी किणीकरसंजय गायकवाड, प्रताप सरनाईक, राजकुमार पटेल, राजेंद्र पाटील, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, प्रदीप जयस्वाल, ज्ञानराज चौगुले, श्रीनिवास वनगा, महेश शिंदे, संजय रायमूलकर, बालाजी कल्याणकर

शिंदेंसोबत अपक्ष कोण?

बच्चू कडू, राजकुमार पटेल, राजेंद्र यड्रावकर, चंद्रकांत पाटील, नरेंद्र भोंडेकर, किशोर जोरगेवार, मंजुळा गावित, विनोद अग्रवाल, गीता जैन हे आमदार आहेत.