BREAKING NEWS : सत्ता संघर्षाचा खेळ सुरु असताना राज्यात ‘राष्ट्रपती राजवट लागू’ होण्याची शक्यता

possibility of 'presidential rule' being imposed in maharashtra

मुंबई : राज्याच्या राजकारणातून आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे.

आमदारांच्या कार्यालयांवर आणि घरांवर हल्ले होत आहेत असेच चित्र कायम राहिल्यास राज्यपाल राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा विचार करू शकतात, असे सूत्रांनी सांगितले.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात नवा भूकंप झाला आहे. महाविकासआघाडीचे सरकार कोसळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह सुमारे 50 आमदार आहेत. त्यामुळे महाविकासघडी सरकारची कोंडी झाली आहे.

ठाकरे सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभा घेत आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी गुजरातमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

काल रात्री ही बैठक झाली. याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात याकडे राज्याच्या राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे.

याशिवाय आता राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यताही विचारात घेतली जात आहे. बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली जात आहे. अनेक ठिकाणी आमदारांचे बॅनर फाडण्यात आले आहेत. काही ठिकाणी त्याचा फोटो कलंकित करण्यात आला आहे.

शिंदे गटाकडून आज प्रथमच पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी दीपक केसरकर यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.