ST Employees Protest : एसटी कर्मचाऱ्यांच्या धुडगूस प्रकरणात नवे वळण, एफआयआरमध्ये धक्कादायक माहिती

ST Employees Protest: New twist in ST employees' Dhudgus case, shocking information in FIR

मुंबई, 09 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी कथित एसटी कर्मचाऱ्यांनी राडा केल्यानंतर या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.

आदल्या दिवशी गुणरत्न सदावर्ते यांनी प्रक्षोभक भाषण केले होते. शरद पवार यांच्या घरी दुपारी ३ वाजता एसटीचे कर्मचारी पोहोचणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, मात्र ते वेळेवर पोहोचू शकले नाहीत, असे पोलिस एफआयआरमध्ये स्पष्ट झाले आहे.

पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटीच्या आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी कथित एसटी कर्मचाऱ्यांनी शिवीगाळ केली होती.

या प्रकरणाची एफआयआर प्रत माध्यमांना देण्यात आली आहे. या एफआयआरमध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

7 एप्रिल रोजी गुणरत्न सदावर्ते यांनी प्रक्षोभक भाषण केले होते. तसेच प्रसारमाध्यमांशी बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी ‘मी शरद पवार यांच्या निवासस्थानी घुसून त्यांना जाब विचारेन’, असा इशारा दिला होता.

या प्रतिक्रियेने प्रेरित होऊन आंदोलकांनी शरद पवार यांच्या घरावर हल्लाबोल केला होता. पोलिसांना दुपारी ३ वाजता माहिती मिळाली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ तारखेला आझाद मैदानावर रात्री बैठक झाली होती. त्या बैठकीत बारामती आणि सिल्व्हर ओक येथे जाण्याबाबत चर्चा झाली होती.

याकरता काही जणांवर जबाबदारी देखील दिली गेली होती. मात्र, पोलिस वेळेवर पोहोचू शकले नाहीत. सदावर्ते यांच्या चिथावणीखोर भाषणामुळे आंदोलकांनी सिल्व्हर ओक गाठले.

धक्कादायक म्हणजे आंदोलक 8 तारखेला दुपारी 3 वाजता सिल्व्हर ओक येथे जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तर 7 तारखेला गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या भाषणात सिल्व्हर ओकमध्ये जावून जाब विचारणार असल्याचे नमूद केले होते.

आझाद मैदानावर उपस्थित असलेल्या पोलिसांनी याबाबत वरिष्ठांना कळवले असतानाही शरद पवार यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला नव्हता.

RECENT POSTS