Beed Crime News : चौथीच्या विद्यार्थिनीशी गैरवर्तन, पालकांनी शिक्षकाला बदडले

Beed Crime News: Fourth grader abused, parents scold teacher

बीड, 09 एप्रिल : बीड येथील नामांकित गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाने चौथीच्या वर्गातील मुलीशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली.

यानंतर संतप्त पालकांनी शाळेत जाऊन शिक्षकाला चांगलीच मारहाण केली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गुरुकुल इंग्लिश स्कूलमधील शिक्षकाने चौथीच्या विद्यार्थिनीशी गैरवर्तन केले. पीडितेने ही बाब घरी सांगितल्यावर धक्काच बसला.

त्यानंतर पीडित चिमुरडीचे कुटुंबीय व नातेवाईकांनी शाळेत जाऊन शिक्षकाला जाब विचारला. यावेळी पालकांनी शिक्षकाला चांगलीच मारहाण केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शिक्षकाला अटक केली. मात्र, अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. याप्रकरणी शाळा व्यवस्थापन शिक्षकाला पाठीशी घालत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

मुलींना शाळेत पाठवण्यासाठी आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची शिकवणी शुल्क आकारणाऱ्या संस्थाचालकांचे मुलांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे उदासीन चित्र आहे.

ज्या वर्गात मुलीवर अत्याचार झाला त्या वर्गात सीसीटीव्ही नव्हते. चौथी इयत्तेच्या विद्यार्थिनीच्या अत्याचाराबाबत पालकांनी आमच्याकडे तक्रार केली आहे.

या तक्रारीची गंभीर दखल घेत संबंधित शिक्षकाला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. गुन्हा दाखल करण्याबाबत चर्चा सुरू आहे. मागील सतरा वर्षांपासून ही शाळा यशस्वीपणे सुरू आहे.

हा प्रकार आजतागायत कधीच आढळून आला नसून आता या प्रकाराचा निषेधही करत आहोत, असे प्राचार्य एस.ए.सर्वज्ञा यांनी सांगितले.

सीसीटीव्हीबाबत विचारणा केली असता त्यांनी सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरू असून पुन्हा असे होणार नाही याची काळजी घेणार असल्याचे मुख्याध्यापक एस.ए.सर्वज्ञा यांनी सांगितले.

बीडमध्ये मुली आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश राज्याच्या शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिले होते.

मात्र, खासगी शिक्षण संस्था शिक्षण शुल्काच्या नावाखाली लाखो रुपये उकळतात. मात्र, या नियमांचे पालन न केल्याने मुलींच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या संस्थेवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे.

RECENT POSTS