उदगीरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे खा. शरदचंद्रजी पवार यांच्या निवास्थानावरील हल्ल्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन संपन्न

उदगीर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानावर समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी महात्मा गांधी गार्डन उदगीर येथे महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन करून पुतळ्या समोर बसून समाजकंटकांना सद्बुद्धी येवो अशी प्रार्थना करीत शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदगीरच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी यांना एक निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवास्थानावर समाजकंटकांनी केलेल्या हल्ला निंदनीय असून पुरोगामी महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभनीय आहे.

आंदोलन करणारे हे कर्मचारी नसून कर्मचाऱ्यांच्या वेषातील गुंड होते आणि त्यांच्या या कृत्यामागे भडकाऊ विषारी भाषण देऊन समाजात दुफळी निर्माण करणारे व मा. कोर्टाच्या निर्णयाचा अवमान करणारे गुणरत्न सदावर्ते व कटामागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्या समाजकंटकांवर कडक कारवाई करावी.

अन्यथा आगामी काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा ईशारा देण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा उदगीर पंचायत समितीचे माजी सभापती प्रा.डॉ. शिवाजी मुळे, विधान सभा अध्यक्ष प्रा प्रवीण भोळे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, शहराध्यक्ष समीर शेख, व्यंकटराव पाटील, सेवादलाचे प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड, माजी शहराध्यक्ष शेख समद, माजी नगरसेवक सय्यद ताहेर हुसेन, अनिल मुदाळे, फैयाज शेख, नाना पटेल, इमरोज हाशमी, विजयकुमार चवळे, सय्यद जानीभाई, युवक शहराध्यक्ष अजय शेटकार, मार्केट कमिटी संचालक शिवानंद तोटकर, जिल्हा उपाध्यक्षा सत्यवती गायकवाड, राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा उर्मिलाताई वाघमारे, शहराध्यक्षा दीपालीताई औटे, बबलू शेल्हाळकर, राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या तालुकाध्यक्षा डॉ. भाग्यश्री घाळे, युवती शहराध्यक्षा प्रा. ज्योती स्वामी, जिल्हा सरचिटणीस हुसनाबानू शेख, युवक तालुका विक्की भासले, कार्याध्यक्ष अजम पटेल, सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष मुकेश भालेराव, कार्याध्यक्ष प्रदीप जोंधळे, शहराध्यक्ष प्रेम तोगरे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष अजहर शेख, शहराध्यक्ष इरफान सय्यद, कार्याध्यक्ष सलीम शेख, ओबीसी शहराध्यक्ष सुधाकर दापकेकर, सांस्कृतिक शहराध्यक्ष अभिजीत औटे, शंकर मुक्कावार, शिवकुमार कांबळे, संदीप देशमुख, बापू सोळुंके, धनाजी बनसोडे, राजकुमार गंडारे, संघशक्ती बलांडे, मुसा पठाण, फेरोज देशमुख, फेरोज पठाण, ऍड. चंद्रशेखर भोसले, सिद्धार्थ सूर्यवंशी, रतन सूर्यवंशी, सागर सोनाळे, मारोती सोळुंके, बाळासाहेब नवाडे, भालचंद्र घोणसीकर, आखिब शेख, अमर जागीदार, सईद चाऊस, अखिल मोमीन, दत्तात्रय काकडे, अनिल कुसाळे, अमोल बिरादार, सतीश कांबळे, साजीद खुरेशी, संतोष जाधव, कपील कांबळे, पप्पू कांबळे, बबन राठोड, सरपंच शाहुराव किवंडे, लहू कांबळे, राजीव वाघे, बालाप्रसाद वाघमारे, कपिल शिंदे, भैयासाहेब बनसोडे, सिकंदर शेख, उमर जहागीरदार, सुमित पाटील, गोपाळ बिरादार, सोनू हाशमी, विशाल हाळीकर, जमभीम सोनवणे, राहुल कांबळे, अजय सकट, सनि सकट, बबलू काळगापुरे, प्रदीप सवारे, अरविंद बिरादार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.