Bombay High Court Recruitment 2022 : मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भरती, शैक्षणिक पात्रता, अंतिम मुदत, एका क्लिकवर

0
45
Bombay High Court Recruitment

Bombay High Court Recruitment 2022 : मुंबई उच्च न्यायालयाने “न्यायिक अधिकारी” च्या एकूण 25 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2022 आहे.

उमेदवार ऑनलाइन (ईमेलद्वारे) अर्ज करू शकतात किंवा खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पाठवू शकतात. या पदासाठी पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

महाराष्ट्र राज्यात 25 जागा रिक्त आहेत. अंतिम मुदतीनंतर पाठवलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्जासंदर्भातील महत्त्वाच्या सूचना bombayhighcourt.nic.in या अधिकृत वेबसाइटवर दिल्या आहेत. उमेदवारांनी अपूर्ण आणि चुकीची कागदपत्रे सादर केल्यास त्यांना अपात्र घोषित केले जाईल.

पदाचे नाव – न्यायिक अधिकारी

पद संख्या – 25 जागा

शैक्षणिक पात्रता – जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश संवर्गातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज पद्धत – ऑनलाईन ईमेल / ऑफलाईन

ईमेल आयडी – [email protected]

अर्ज करण्याचा पत्ता – रजिस्ट्रार जनरल, मुंबई उच्च न्यायालय, फोर्ट, मुंबई, 400 032

महत्त्वाचे

  • उमेदवारांनी ऑनलाईन (ईमेल) किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे
  • शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही
  • अर्ज करण्यासंदर्भातील महत्त्वाच्या सुचना अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत
  • अपूर्ण कागदपत्रं आणि माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केलं जाईल
  • अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघावी