माझ्यावर झालेली शाईफेक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान : चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील

पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील चिंचवडमध्ये मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्यासाठी आले असताना त्यांच्या तोंडावर शाई फेकण्यात आली.

यानंतर पोलिसांनी शाई फेकणाऱ्यांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ‘मी कोणाला घाबरत नाही, हिंमत असेल तर पुढे या’ असे म्हटले आहे.

मी कार्यक्रमाला जात असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मी नियोजित सर्व कार्यक्रम करीन. मी कोणाला घाबरत नाही. माफी मागितल्यानंतरही एखाद्याला अशी दादागिरी करावी वाटत असेल तर चुकीचे आहे.

विचाराची लढाई विचारांनी लढावी, असा भ्याड हल्ला करणे चुकीचे आहे. हिंमत असेल तर समोरुन या. सगळं पोलिस डिपार्टमेंट बाजूला करतो, असं ते म्हणाले.

गिरणी कामगाराचा मुलगा ते मंत्री 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, ही झुंडशाही आहे. महाराष्ट्र सरकार हे झुंडशाही सहन करणार नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे करायचे ते करतील, मी यावर कोणतीही कारवाई करणार नाही.

आमच्या कार्यकर्त्यांना खुली सुट्टी दिली असती तर काय झाले असते? पण ही आपली संस्कृती नाही. शब्दाची फिरवाफिरवी करता येते. मी काल आणि आज माफी मागितली.

गिरणी कामगाराचा मुलगा ते मंत्री ही वाटचाल केली आहे. मी भिणारा आणि लपून बसणारा कार्यकर्ता नाही. विचाराची लढाई न लढता हे भ्याड हल्ले सुरू आहेत. उद्यापासून पोलिस प्रोटेक्शनही नसेल, हिंमत असेल तर समोर या, असेही पाटील म्हणाले.

कोण काय करतंय ते बघेन : चंद्रकात पाटील 

हा चुकीचा पायंडा असल्याचे पाटील म्हणाले. पोलिसांनी कोणाकोणाकडे लक्ष देतील. कोण कार्यकर्ता आणि कोण बदमाश हे कसे ओळतील. कोणावरही कारवाई करू नका, असेही मी देवेंद्रजींना सांगितले आहे.

मी सर्व कार्यक्रमांना जाईन. बघू या समोर कोण काय करतंय. ही झुंडशाही राजवट नाही, लोकशाही आहे. आजची भ्याड कृती डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा हा अपमान आहे.

पैठणमध्ये जे बोललो त्याचा विपर्यास करण्यात आला आहे. मात्र पैशांची उधळपट्टी झाली, लोकसहभागातून शाळा उभ्या राहिल्या, असे म्हणण्या ऐवजी मी ग्रामीण भाषेत बोललो, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

कायदा हातात घेऊ नका

मी कार्यकर्त्यांना राहण्याचे आवाहन करीत आहे. कायदा हातात घेऊ नका. काही कार्यकर्ते ओरडले तर काही आक्रोश करीत होते, मी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन करतो, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

मी एक सेनानी आहे, रडणारा बाळ नाही. आता विरोधी पक्षांनी सांगावे की ही झुंडशाही चालणार आहे का? असा सवाल त्यांनी केला. या घटनेचा शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, सुषमा अंधारे यांनी निषेध करावा, असेही चंद्रकात पाटील यांनी म्हटले आहे.

नेमकं काय झालं 

चिंचवडमध्ये मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी चंद्रकांत पाटील आले होते. कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापूर्वीच एका व्यक्तीने चंद्रकांत पटेल यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली.

एका पदाधिकाऱ्याच्या घरातून ते कार्यक्रमस्थळी रवाना झाले होते. तेवढ्यात एकाने थेट त्यांच्या तोंडावर शाई फेकली आणि त्यांनी महात्मा फुलेंचा जयघोष केला. त्यानंतर पोलिसांनी शाई फेकणाऱ्यांना अटक केली.

हे देखील वाचा