IND vs BAN 3rd ODI: इशान किशनचे धडाकेबाज द्विशतक आणि विराट कोहलीच्या शतकानंतर, शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेलच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने तिसरा आणि शेवटचा वनडे 227 धावांनी जिंकला. नाणेफेक हारल्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशसमोर 410 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत बांगलादेश संघाला अवघ्या 182 धावांत रोखले.
भारताने सामना जिंकला, बांगलादेशने मालिका जिंकली
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशचा विक्रमी २२७ धावांनी पराभव करून भारताने क्लीन स्वीपपासून स्वतःला वाचवले आहे.
भारताने हा सामना जिंकला असला तरी बांगलादेशने ही मालिका 2-1 अशी जिंकली आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाने बांगलादेशला 410 रन्सचं टार्गेट दिलं होतं, मात्र बांगलादेशचा संघ 182 रन्सवर ऑलआऊट झाला.
भारत-बांगलादेश वनडे मालिका
पहिला वनडे – बांगलादेश 5 धावांनी जिंकला
दुसरी वनडे – बांगलादेश 1 विकेटने जिंकला
तिसरी वनडे – भारत 227 धावांनी जिंकला
3RD ODI. India Won by 227 Run(s) https://t.co/HGnEqugMuM #BANvIND
— BCCI (@BCCI) December 10, 2022
इशान किशनचे द्विशतक आणि विराट कोहलीच्या अप्रतिम शतकामुळे भारताने येथे डोंगराएवढी धावसंख्या उभारली.
बांगलादेश हे दडपण सहन करू शकला नाही आणि एक एक करून त्याची बॅटिंग युनिट कोलमडली. टीम इंडियाला येथे क्लीन स्वीप होण्याचा धोका होता, पण अखेरचा सामना जिंकून त्याने हा धोका टळला.