SBI Recruitment 2023 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अधिकारी पदांसाठी नोकर भरती, पगार 60 लाखांपर्यंत

SBI Recruitment 2023

SBI Recruitment 2023 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) च्या पदांसाठी 2022 च्या भर्तीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन भरती परीक्षा जानेवारी किंवा फेब्रुवारी 2023 मध्ये आयोजित केली जाऊ शकते.

SBI Recruitment 2022 माहिती 

SBI SCO भर्ती 2022 साठी ऑनलाइन अर्ज 09 डिसेंबरपासून सुरू झाले आहेत. पात्र उमेदवार 29 डिसेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

सर्व पात्र उमेदवारांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विविध विभागांमध्ये नियुक्त केले जाईल. उमेदवार खाली दिलेल्या अधिसूचनेत वेतनश्रेणी, रिक्त पदांचे तपशील, पात्रता निकष, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशील तपासू शकतात.

SBI Recruitment 2022 या पदांसाठी भरती

  • उपव्यवस्थापक >> 16 पदे
  • वरिष्ठ कार्यकारी >> 17 पदे
  • कार्यकारी >> 02 पदे
  • वरिष्ठ विशेष कार्यकारी >> 01 पद
  • डेटा प्रोटेक्शन ऑफिसर >> 01 पद
  • असिस्टंट डेटा ऑफिसर >> 01 पदे
  • वरिष्ठ क्रेडिट स्पेशलिस्ट >> 16 पदे
  • एकूण रिक्त पदांची संख्या >> 54 पदे

SBI Recruitment 2022 अर्ज फी

  • सामान्य, EWS आणि OBC श्रेणीतील उमेदवारांना 750 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
  • राखीव श्रेणीतील उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

SBI Recruitment 2022 साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

  • 1: सर्वप्रथम SBI करिअर्सच्या अधिकृत वेबसाइटला sbi.co.in/web/careers येथे भेट द्या.
  • 2: होम पेजवर, ‘RECRUITMENT OF SPECIALIST CADRE OFFICERS’ या लिंकवर क्लिक करा.
  • 3: येथे ‘Apply Online’ लिंकवर क्लिक करा.
  • 4: नोंदणी करा आणि अर्ज भरा.
  • 5: आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फी सबमिट करा.
  • 6: सबमिट वर क्लिक करा आणि पुढील संदर्भासाठी पुष्टीकरण पृष्ठाची प्रिंटआउट घ्या.

SBI Recruitment 2022 पगार 

  • उपव्यवस्थापक >> 48170-1740/1-49910-1990/10-69810 रुपये
  • वरिष्ठ कार्यकारी >> वार्षिक 24 लाख रुपये (CTC)
  • कार्यकारी >> वार्षिक 20 लाख रुपये (CTC)
  • वरिष्ठ विशेष कार्यकारी >> वार्षिक 27 लाख रुपये (CTC)
  • SBI SCO भर्ती 2022 वेतनमान >> पगार जाणून घ्या
  • डेटा प्रोटेक्शन ऑफिसर >> वार्षिक 60 लाख रुपये (CTC)
  • सहाय्यक डेटा अधिकारी >> वार्षिक 35 लाख रुपये (CTC)
  • वरिष्ठ क्रेडिट स्पेशालिस्ट >> (MMGS-III) – 63840-1990/5-73790-2220/2-78230 रुपये
  • वरिष्ठ क्रेडिट स्पेशालिस्ट >> (MMGS-III) -76010-2220/4-84890-2500/2-89890 रुपये

SBI Recruitment 2022 अधिसूचना

  1. जाहिरात क्र. CRPD/SCO/2022-23/24
  2. जाहिरात क्र. CRPD/SCO/2022-23/27
  3. जाहिरात क्र. CRPD/SCO/2022-23/28