Organic Farming Business Idea : आजकाल सुशिक्षित लोकही शेतीकडे वळत आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ते शेतीला बंपर कमाई करून देणारा फायदेशीर व्यवसाय म्हणून पहात आहेत.
काही महिन्यांपूर्वी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्याला व शेती व्यवसायाला (Agriculture) केंद्रस्थानी ठेवण्यात आले होते.
रासायनिक खतांच्या अनिर्बंध वापरात महाराष्ट्र शीर्षस्थानी येतो त्यामुळे ही निश्चितच चिंतेची बाब ठरत आहे. राज्यातील अनेक शेतकरी बांधव आता सेंद्रिय शेतीकडे (Organic Farming) मोठ्या आशेने बघू लागले आहेत त्यामुळे आगामी काही दिवसात निश्चितच सेंद्रिय शेतीला चालना मिळणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
त्या अर्थसंकल्पात नैसर्गिक शेतीला जास्त महत्त्व देखील दिले होते. रासायनिक खतांच्या (Chemical Fertilizer) अनिर्बंध वापरामुळे जमिनीचे आरोग्य, मानवाचे आरोग्य तसेच पर्यावरण मोठ्या संकटात सापडत आहे.
त्यामुळे तुम्हालाही जर शेतीतून बंपर कमाई करायची असेल, तर आज आम्ही तुम्हाला एक चांगली कल्पना देत आहोत. आम्ही अशा उत्पादनाबद्दल चर्चा करत आहोत, जे शेतकरी निरुपयोगी समजून फेकून देतात. परंतु हे उत्पादन शेतकर्यांसाठी बंपर उत्पन्नाचा उत्तम स्त्रोत बनू शकते.
आम्ही केळीच्या खोडापासून (Banana Stem & Peel) सेंद्रिय खत बनवण्याबद्दल बोलत आहोत. साधारणपणे शेतकरी केळीचे कांड व सालपट (Banana Stem & Peel) निरुपयोगी समजून शेतातच सोडून देतात.
यामुळे पर्यावरणाची हानी होते. यासोबतच जमिनीची सुपीकताही कमी होते. या देठाचे असे सेंद्रिय खत बनवून मोठे पैसे कमावता येतात.
सेंद्रिय खत कसे बनवायचे
मीडिया रिपोर्ट्सनुसार, केळीच्या खोड किंवा देठापासून सेंद्रिय खत बनवण्यासाठी आधी एक खड्डा तयार केला जातो. ज्यामध्ये केळीची देठ व खोड टाकली जातात. मग त्यात शेण आणि तणही टाकले जाते.
यानंतर डिकंपोजरची फवारणी केली जाते. काही दिवसांत ही वनस्पती खताच्या स्वरूपात तयार होते. ज्याचा वापर करून शेतकरी आपले उत्पन्न वाढवू शकतात.
शेतकऱ्यांनी शेतात रासायनिक खतांचा कमी वापर करावा, यासाठी सरकार शेतकऱ्यांना अशी सेंद्रिय खते बनवून वापरण्याचा सल्ला देत आहे.
सेंद्रिय खताला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे. यासाठी शेतकऱ्यांना प्रबोधन करण्यात येत आहे. यासोबतच शेतकऱ्यांना प्रशिक्षणही दिले जाते.
सेंद्रिय खताचा वापर केल्यास जमिनीची सुपीक शक्ती टिकून राहते. यासोबतच लोकांना प्रदूषणमुक्त अन्नधान्य मिळणार आहे. ज्याद्वारे सर्व प्रकारचे आजार टाळता येतात.