महाराष्ट्रात वीज संकट : ‘राना’चा प्रश्न वाऱ्यावर सोडून सरकार ‘राणा’दाम्पत्याच्या आंदोलनात अडकले

117
महाराष्ट्रात विजेचे संकट: 'राणा'चा मुद्दा वाऱ्यावर सोडून सरकार 'राणा' दाम्पत्याच्या आंदोलनात अडकले
महाराष्ट्रात विजेचे संकट: 'राणा'चा मुद्दा वाऱ्यावर सोडून सरकार 'राणा' दाम्पत्याच्या आंदोलनात अडकले

मुंबई : लोडशेडिंगमुळे ‘राणा’ दाम्पत्यापेक्षा गावागावांतील ‘राना’चा प्रश्न राज्यासमोर अधिक गंभीर झाला आहे. गेल्या दोन वर्षात चांगला पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीसाठा उपलब्ध असला तरी विजेच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे.

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके जळू लागली आहेत. महाराष्ट्रात लोडशेडिंगविरोधात आंदोलने होत आहेत. विरोधी पक्ष सध्या सरकारची फरपट पहात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा संघर्ष पाचवीला पुजलेला आहे.

अनेक ठिकाणी रात्रीची वीज खंडित उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना डोळ्यात तेल घालून रात्रीचा दिवस करून शेतीचे काम करावे लागत आहे.

रात्री वीज आल्यावर शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना साप, विंचू व इतर श्वापदांच्या हल्ल्याला सामोरे जावे लागत आहे.

विजेचा खेळ हा शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ झाला असताना सरकार आणि मुख्यमंत्री ‘राणा’ दाम्पत्याच्या आंदोलनात का अडकून पडले आहे, असा प्रश्न राज्यातील सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

प्रत्येक वेळी सर्वसामान्यांच्या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करून इतर स्टंटबाजी करणाऱ्या आंदोलनांना माध्यमातून अधिकाधिक प्रसिद्धी मिळत आहे.

शेतकऱ्यांची स्थिती आधीच बिकट असतानाच, हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिल्याने फळ उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

त्यामुळे एकीकडे महागाई वाढत असताना शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका काही संपताना दिसत नाही. तर सरकार मात्र ‘राणा’दाम्पत्यांच्या आंदोलनात अडकून पडल्याची टीका सोशल मीडियावर होऊ लागली आहे.