मुंबई : अपक्ष आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा आणि शिवसेनेतील संघर्ष वाढत चालला आहे. राणा दाम्पत्याने उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याचे संकेत होते.
त्यासाठी ते काल (दि.२२) मुंबईत दाखल झाले आहेत. राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांच्यावर युवासेना नेते वरुण सरदेसाई यांनी टीका केली आहे.
राणा दाम्पत्याला आम्ही सांगत आहोत, मातोश्रीवर या आणि महाप्रसाद घ्या. फक्त तारखा देऊ नका. एकदा येऊन जा, असे आव्हान सरदेसाई यांनी दिले. हे सर्वकाही भाजप करत आहे.
काहींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करून केंद्राला संरक्षण देण्याची योजना आखली असल्याचे सरदेसाई म्हणाले. सर्वांना चकवा देत राणा दाम्पत्य मातोश्रीवर पोहोचले आहे.
त्यांच्या इशाऱ्यानंतर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मातोश्रीबाहेर बंदोबस्त तैनात केला आहे.