MLC Vacant 10 Seats : विधान परिषदेतील दहा आमदारांचा कार्यकाळ पूर्ण होणार; कोणाचा नंबर लागणार?

MLC Vacant 10 Seats: Ten MLAs in Legislative Council will complete their term; Whose number will it be?

मुंबई : विधानसभा सदस्यांद्वारे निवडून देण्यात येणाऱ्या विधानपरिषदेतील दहा आमदारांची मुदत येत्या 7 जुलै 2022ला संपते आहे. त्यामुळे नवीन आमदारात कोणाचा नंबर लागणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

राज्याच्या विधान परिषदेतील आमदारांची संख्या आता पुन्हा एकदा कमी होणार आहे. दहा आमदारांची मुदत 7 जुलै 2022 रोजी संपत आहे.

रबरी लिंग प्रकरणाच्या चौकशीचे आदेश, दोषींवर कारवाई होणार : राजेंद्र शिंगणे

राज्यपालांनी आधीच 12 पदे नियुक्त केली असताना, आणखी दहा पदे रिक्त असतील. त्यामुळे या सदस्यांची निवडणूक लवकरच जाहीर होणार असल्याचे मानले जात आहे.

ज्या आमदारांचा कार्यकाळ संपला आहे, त्यात भाजपचे सहा आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन आमदार आहेत.

कोणत्या आमदारांची संपणार मुदत?

येत्या ७ जुलै २०२२ रोजी मुदत संपणाऱ्या आमदारांमध्ये खालील नावाचा समावेश आहे.

  1. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर
  2. उद्योग मंत्री सुभाष देसाई
  3. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर
  4. भाजपचे आमदार प्रसाद लाड
  5. सुरजितसिंग ठाकूर
  6. विनायक मेटे
  7. सदाशिव खोत
  8. राष्ट्रवादीचे आमदार संजय दौंड
  9. भाजपचे दिवंगत आमदार आर. आर. सिंह
  10. शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक

संधी कोणाला मिळणार?

विधानपरिषदेच्या दहा जागा रिक्त झाल्याने त्याच आमदारांना रिक्त पदे भरण्यासाठी आणखी एक संधी दिली जाते कि नवीन नावांचा विचार केला जातो याचा विचार सुरू आहे. महाविकास आघाडीकडे 170 आमदार आहेत.

या संख्याबळाच्या जोरावर महाविकास आघाडी सरकार पाच जागा आणि अन्य पक्षांच्या मदतीने आणखी एक जागा जिंकू शकते.

The Kashmir Files : प्रत्येक हिंदुस्थानीनं हा चित्रपट पाहावा, आमिर खानची प्रतिक्रिया

विधानसभेतील भाजपच्या घटत्या संख्याबळामुळे यावेळी सहाऐवजी केवळ चार आमदार निवडून येऊ शकतात. यावेळी प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे.

भाजपचा घटक पक्ष भाजपाकडे जागा मागण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांना मंत्रिपदाची जबाबदारी असल्यानेआणखी एक संधी मिळू शकते, तर आदेश बांदेकर यांचा विचार पक्षाकडून केला जाईल अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

RECENT POSTS