अकोला: कुटुंब नियोजन किटमध्ये एका आशा सेविकेला रबरी लिंग दिल्याचा प्रकार समोर आला आहे. पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.
अकोल्यातील कुटासा येथे आयोजित कार्यक्रमात ते माध्यमांशी बोलत होते. भाजप आमदार श्वेता महाले यांनी नवाब मलिक यांच्यावर केलेले आरोपही त्यांनी फेटाळून लावले.
बुलडाणा येथे कुटुंब नियोजन किटमध्ये रबरी लिंग दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यावर पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी प्रतिक्रिया दिली.
या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे बुलडाण्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.
यामध्ये जे दोषी असतील, ज्यांनी हे जाणूनबुजून केले असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे शिंगणे म्हणाले. हा राष्ट्रीय कार्यक्रम असून या कार्यक्रमात कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना जबाबदार धरण्यात यावे, असे ते म्हणाले.
भाजप आमदार श्वेता महाले यांच्या वक्तव्यावर शिंगणे म्हणाले की, नवाब मलिक हे अल्पसंख्याक नेते असून, अल्पसंख्याक नेत्यांवर असे गंभीर आरोप केले जात आहेत.
हा एका कटाचा भाग आहे आणि मी नवाब मलिक यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. खूप चांगले नेते आणि प्रगतीचा ध्यास असणारा नेता आहे.
त्यांच्यावर आरोप जाणीवपूर्वक केले जाते आहेत, अशा कोणत्याही प्रकरणात त्यांचा संबंध नाही व नसावा असे वयक्तिक मत असल्याचेहि शिंगणे म्हणाले.