MLA Fund Increased In Maharashtra : अजित पवारांची आमदारांसाठी मोठी घोषणा, आमदार निधीत घसघशीत वाढ

165
MLA Fund Increased In Maharashtra: Ajit Pawar's big announcement for MLAs, drastic increase in MLA fund

मुंबई, 16 मार्च : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister and Finance Minister Ajit Pawar) यांनी सर्व आमदारांच्या स्थानिक विकास निधीत एक कोटींनी वाढ करून त्यांना अधिवेशनासाठी खास भेट दिली.

याशिवाय आमदारांच्या चालक आणि स्वीय साहाय्यकाच्या वेतनात पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. विधानसभेत त्यांनी ही घोषणा केली. सध्या आमदारांना दरवर्षी चार कोटी रुपयांचा स्थानिक विकास निधी मिळत होता.

अजित पवारांच्या घोषणेमुळे ती आता पाच कोटी झाली आहे. मागील भाजप सरकारच्या काळात तीन कोटी रुपयांचा निधी दिला जात होता.

Crime News : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या, आरोपी पत्नीसह प्रियकराला अटक 

अजित पवारांनी गेल्या अधिवेशनात एक कोटी आणि या अधिवेशनात एक कोटी वाढवले. अजित पवार म्हणाले की, आता राज्यातील आमदारांना खासदारांइतकाच निधी मिळणार आहे.

आमदारांच्या चालकांचे सध्याचे वेतन 20 हजारांऐवजी 15 हजार रुपये आणि आमदारांच्या स्वीय सहाय्यकांना 25 हजारांऐवजी 30 हजार रुपये मानधन देण्याची घोषणा पवार यांनी केली. या घोषणेचे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार स्वागत केले.

तिरुमला पर्वतावरील 1500 दशलक्ष वर्षे जुन्या ‘शिला तोरणम’चे रहस्य शास्त्रज्ञ अद्याप का उलगडू शकत नाहीत?

तर सद्या आमदारांच्या वाहन चालकांना १५ हजार रुपये वेतन मिळत होते ते २० हजार रुपये आणि आमदारांच्या स्वीय सहाय्यकाला २५ हजाराऐवजी ३० हजार रुपये वेतन देणार असल्याची पवार यांनी घोषणा केली. या घोषणेचे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बाके वाजवून स्वागत केले.

RECENT POSTS