उदगीरात 15 कोटीच्या प्रशासकीय इमारत बांधकाम व ट्रॅफिक सिग्नल उभारणीचा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते शुभारंभ

Minister of State Sanjay Bansode inaugurated 15 crore administrative buildings and traffic signals on the main roads of the city.

उदगीर : तालुक्यातील अनेक प्रशासकीय कार्यालय वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असून यामुळे तालुक्यातील नागरिकांची प्रशासकीय कामासाठी ओढाताण होते.

नागरिकांची ही गैरसोय टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतही तालुक्यातील कार्यालय एकाच इमारतीत आणण्यासाठी शासनाने प्रशासकीय इमारतीस मान्यता दिली असून यासाठी शासनाने 15 कोटीचा रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे शुभारंभ राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, माजी नगरध्यक्ष राजेश्वर निटुरे, पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी मुळे, कल्याण पाटील, चंद्रकांत टेंगटोल, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे , कार्यकारी अभियंता एम. एम. पटेल, समीर शेख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मुन्ना पाटील आदी पदाधिकारी, नागरिक, संबंधित विभागाचे अधिकारी इत्यादी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले की, मागील दोन वर्षांपासून आपण उदगीरच्या सर्वांगीण विकास करीत आहोत.

उदगीर शहराचा होत असलेला विकास, पायाभूत विकासासोबत आपण सांस्कृतिक विकासासाठी प्रयत्न करीत आहोत. मागील काळात पंचायत समिती, लिंगायत भवन, बौद्ध विहार याचे बांधकाम सुरू आहे, याचप्रमाणे प्रशासकीय इमारतीचे बांधकामाचे शुभारंभ करण्यात येत आहे.

यामुळे तालुक्यातील नागरिकांची सोय होणार आहे. या इमारतीमध्ये कृषी, महसूल व वन, सहकार क्षेत्र तसेच तालुका स्तरावरील सर्व कार्यालये या इमारतीमध्ये एकत्रित येणार आहेत. ही इमारत एक – दिड वर्षात ही इमारत पूर्णत्वाकडे घेवून जाणार आहोत.

उदगीर शहराच्या मुख्य रस्त्यावर चार ट्रॅफिक सिग्नलचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते शुभारंभ

उदगीर नगर परिषदेतंर्गत सौर उर्जेवरील ट्रॅफिक सिग्नल शहरातील मुख्य रस्त्यावर छत्रपती ‍शिवाजी महाराज चौक, डॉ. जाकीर हुसेन चौक, जय जवान चौक व कॅप्टन कृष्णकांत चौक अशा चार चौकामध्ये उभारण्यात येत आहेत. ट्रॅफिक सिग्नल उभारणीच्या कामाचा शुभारंभ राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी सदरील कामाकरिता महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) योजनेतंर्गत प्राप्त निधीतून सदरील कामे पुढील एक महिन्याच्या आत पूर्ण करण्यात येतील असे सुचित केले.

सौर उर्जेवरील ट्रॅफिक सिग्नल मुळे पर्यावरण पुरक असे सिग्नल बसविण्यात येणार आहेत. शहरातील सहदारीच्या ठिकाणी वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे यामुळे वाहतुकीचे अडथळे दुर होणार आहेत.

सदरील कार्यक्रमाकरिता बसवराज पाटील नागराळकर, राजेश्वरजी निटूरे, प्रा. डॉ. शिवाजी मुळे, सिध्देश्वर (मुन्ना) पाटील, कल्याण पाटील, श्रीमती लक्ष्मीबाई भोसले, चंद्रकांत टेगेटोल, समीर शेख, चंद्रअप्पा वैजापुरे, मंजुरखाँ पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ट्रॅफिक सिग्नल उभारणी कामाचा शुभारंभ कार्यक्रम पार पडला.