तुम्ही म्हणजेच मराठी माणूस आणि महाराष्ट्र, हा समज मनातून काढून टाका : देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Eknath Shinde: Devendra Fadnavis arrives in Delhi, new Maharashtra government coming soon

मुंबई, 25 मार्च : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केलेल्या भाषणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चांगलेच बोचरे भाषण केले.

मुख्यमंत्र्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने विरोधी पक्षाने विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकले. तुम्ही म्हणजे मुंबई नाही असेही फडणवीस म्हणाले. तुम्ही म्हणजेच मराठी माणूस आणि महाराष्ट्र, हा समज मनातून काढून टाका, असेही फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले की, अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकाही प्रश्नाला उत्तर मिळाले नाही. मुख्यमंत्र्यांकडे विनोद करण्याचे उत्तम साधन आहे. युक्रेनने नाटोऐवजी मुख्यमंत्र्यांची मदत घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक यांना मुख्यमंत्री ठाकरे कसे समर्थन देऊ शकतात. त्यांचे समर्थन केल्याचे मला दु:ख झाले.

अफजलला फाशी देऊ नका, पत्र लिहिणारे तुमच्यासोबत आहेत. तुमच्या काही घरगड्यांना ED बोलावते, म्हणून तुम्ही ED ला घरगडी म्हणता का? असा सवालही फडणवीस यांनी केला.

“आम्ही पारदर्शक असल्यामुळे आरशासमोर व समाजासमोर उभे आहोत,” असे त्यांनी सत्ताधारी पक्षाला सुनावले. त्यांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले नाही.

त्यांचे भाषण विधीमंडळातील नसून शिवाजी पार्कचे असल्याचे दिसत होते. नवाब मलिकने 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपींकडून जमीन खरेदी केली होती. मग त्यांचे समर्थन कसं काय करणार?असा सवालही फडणवीस यांनी केला.

युक्रेनने NATO ऐवजी मुख्यमंत्र्यांची मदत घ्यायला हवी होती, असे सांगून मुख्यमंत्र्यांकडे वेगळेच ‘टोमणा’ बॉम्ब आहे, सत्तेसाठी तुम्ही कोणत्या शकुनीसोबत गेला आहात, असा सवालही त्यांनी केला. कपट कारस्थानाने राज्य पांडवांनी नव्हे तर कौरवांनी ताब्यात घेतले असल्याचेही फडणवीस म्हणाले.

RECENT POSTS