योगींचा शपथविधी सोहळा : यूपीत भाजपाचे धक्कातंत्र; कॅबिनेटची संपूर्ण यादी

0
148
Yogi's swearing-in ceremony, Complete list of cabinets

लखनऊ : योगी आदित्यनाथ यांनी आज सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. योगी यांच्यासह दोन उपमुख्यमंत्री आणि अन्य 50 मंत्र्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली.

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले केशव प्रसाद मौर्य यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरले आहे. मौर्य यांच्यासोबत ब्रजेश पाठक यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळवल्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात कोणाकोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

योगी मंत्रिमंडळात पहिल्या टर्ममधील काही चेहरे कायम ठेवण्यात आले असून यावेळी काही नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

योगींच्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश? वाचा संपूर्ण यादी…

योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर विविध कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला.

सूर्य प्रताप शाही, सुरेश कुमार खन्ना, स्वतंत्र देव सिंह, बेबी राणी मौर्य, लक्ष्मी नारायण चौधरी, जयवीर सिंह, धर्मपाल सिंह, नंद गोपाल गुप्ता, भूपेंद्र सिंह चौधरी, अनिल राजभर, जितिन प्रसाद, राकेश सचान, अरविंद कुमार शर्मा, योगेंद्र उपाध्याय, आशिष पटेल, संजय निषाद यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

दुसरीकडे, नितीन अग्रवाल, कपिलदेव अग्रवाल, रविंद्र जयस्वाल, संदीप सिंह, गुलाब देवी, गिरीश चंद्र यादव, धर्मवीर प्रजापती, असीम अरुण, जेपीएस राठौर, दयाशंकर सिंह, नरेंद्र कश्यप, दिनेश प्रताप सिंह, अरुण कुमार सक्सेना, दयाशंकर मिश्र दयालू यांनी राज्यमंत्रिपदाची (स्वतंत्र प्रभार) शपथ घेतली.

राज्यमंत्रिपदी कोणाला मिळाली संधी?

योगींच्या मंत्रिमंडळात मयंकेश्वर सिंह, दिनेश खटिक, संजीव गौड, बलदेव सिंह ओलख, अजित पाल, जसवंत सैनी, रामकेश निषाद, मनोहर लाल मन्नू कोरी, संजय गंगवार, बृजेश सिंह, केपी मलिक, सुरेश राही, सोमेंद्र तोमर, अनूप प्रधान, प्रतिभा शुक्ला, राकेश राठौड, रजनी तिवारी, सतीश शर्मा, दानिश आजाद अंसारी, विजय लक्ष्मी गौतम यांना राज्यमंत्रिपदी संधी देण्यात आली आहे.

RECENT POSTS