Tech News : इस्टंट मेसेंजिग ॲप व्हॉट्सॲप आता ग्रुप ॲडमिनना आणखी अधिकार बहाल करण्याच्या तयारीत आहे.
ग्रुप चॅटमध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी नव्या अपडेटेड व्हर्जनमध्ये दमदार फिचर्स मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्हर्जन 2.22.11.4 वर ही अपडेट मिळेल.
व्हॉट्सॲप अपडेट ट्रॅक करणाऱ्या WABetainfo नुसार ग्रुप ॲडमिन यांना मेसेज डिलीट करता येतील.
ते मेसेज ग्रुप सदस्यांनी पाठवले असले, तरी ते डिलीट होतील. ग्रुप ॲडमिनने तो मेसेज डिलीट केल्यानंतर युझर्सना तो this was removed by an admin असे दिसेल.
या फिचर्सवर अजूनही काम सुरु आहे. मात्र, ते फिचर साधारण कसे दिसेल स्क्रीनशॉट त्यांनी शेअर केला आहे.