नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते आज मुंबई-नागपूर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी उपस्थितांना संबोधित करताना महामार्गाच्या कामाची माहिती दिली.
त्यांनी पंतप्रधानांचे आभारही मानले. समृद्धी महामार्गाचे काम करताना अनेक अडचणी आल्या पण आमचे ध्येय स्पष्ट होते. कोणत्याही अडचणीवर मात करून महाराष्ट्राच्या विकासाचा हा समृद्धीचा महामार्ग पूर्ण करायचा होता. आम्ही कष्टाळू मंत्री असून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हे आमचे ध्येय आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भक्कम साथ महाराष्ट्राला लाभली आहे.
“समृद्धी महामार्गाचे स्वप्न मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी पाहिले. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून हा प्रकल्प माझ्यावर सोपवला. समृद्धी महामार्ग हा राज्याच्या विकासाचा मार्ग आहे आणि तो आम्ही विक्रमी वेळेच्या आत पूर्ण करू शकलो याचा आम्हाला अभिमान आणि आनंद आहे.
लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या ध्येयामुळे महाराष्ट्रानेही त्यांना पाठिंबा दिला आहे. हे सरकार अस्तित्वात येत असताना जनतेच्या विकासासाठी आणि राज्याच्या प्रगतीसाठी काम करा, असे त्यांनी मला व फडणवीसांना सांगितले, त्याच निर्देशानुसार आम्ही काम करत आहोत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
आम्ही मेहनती मंत्री आहोत
राज्याचा सर्वांगीण विकास करणे हे आमचे ध्येय आहे. आमच्याकडे काम करणारे आणि लोकांसाठी कष्ट करणारे मंत्री आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राला अशीच साथ देत राहतील असा आम्हाला विश्वास आहे. मोदींचा आशीर्वाद आमच्यावर कायम राहणार आहे. महाराष्ट्र असाच प्रगती करत राहील, असा आम्हाला विश्वास आहे. असे एकनाथ शिंदे म्हणाले.