समृद्धी महामार्गाचे लोकार्पण आणि CM शिंदेंच्या पाठीवर पंतप्रधान मोदींची कौतुकाची थाप

55
Inauguration of Samriddhi Highway and praised PM Modi on CM Shinde's back

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मंत्री नितीन गडकरी, डॉ. भारती पवार यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते.

मोदींनी समृद्धी महामार्गाच्या कोनशिलेचे अनावरण केले तेव्हा पंतप्रधानांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीवर थाप मारली.

700 किमी लांबीचा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रासाठी गेम चेंजर ठरणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता.

महामार्गाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण झाले असून अखेर आज नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या महामार्गावरून प्रवास करण्याचा अनुभवही मोदींनी घेतला. त्यापूर्वी मोदींच्या हस्ते महामार्गाची कोनशिला बसवण्यात आली.

कोनशिलेचे अनावरण केल्यानंतर मोदींनी फोटो सेशनच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शेजारी उभे असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जवळ घेऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

मुख्यमंत्रीही मोदींचे आभार मानताना दिसले. मोदींच्या हस्ते आज नागपुरात सुमारे 75५ हजार कोटींच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

ढोलताशा वादनाचा पंतप्रधानांनी आनंद लुटला

समृद्धी महामार्गावरून प्रवास केल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात पंतप्रधानांच्या ताफ्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी पंतप्रधानांनी सर्वांचे आभार मानले. त्यांनीही या आनंदात सहभागी होऊन ढोल-ताशांचा आनंद लुटला.