खरगे काँग्रेसचे अनुभवी नेते असले तरी ते बदल घडवून आणू शकत नाहीत : शशी थरूर यांचे थेट आव्हान

Though Kharge is an experienced Congress leader, he cannot bring about change: Shashi Tharoor's direct challenge

Shashi Tharoor’s Direct Challenge : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आता पक्षाचे खासदार शशी थरूर आणि ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यात थेट लढत होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 8 ऑक्टोबर असून, त्यानंतर परिस्थिती अधिक स्पष्ट होईल.

मात्र, आपण निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचे थरूर यांनी स्पष्ट केले आहे. कारण आपण पाठिंबा देणाऱ्यांचा विश्वासघात करणार नाही. दरम्यान मल्लिकार्जुन खरगे यांच्या सारखे नेते काँग्रेसमध्ये बदल घडवून आणू शकत नाहीत, असे म्हणत थरूर यांनी खर्गे यांच्यावर तोफ डागली आहे.

वृत्तसंस्थेनुसार, नागपुरातील एका कार्यक्रमादरम्यान शशी थरूर म्हणाले की, आम्ही परस्पर शत्रू नाही, हे युद्ध नाही. ही आमच्या पक्षाचे भविष्य ठरविणारी निवडणूक आहे.

Congress President Election : नव्या अध्यक्षांना काम करण्याचे स्वातंत्र्य मिळाले नाही, तर आम्ही आवाज उठवत राहू; पृथ्वीराज चव्हाण यांचा इशारा

मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस पक्षाच्या शीर्ष 3 नेत्यांमध्ये येतात. हे खरे असले तरी त्यांच्यासारखे नेते बदल घडवून आणू शकत नाहीत आणि विद्यमान व्यवस्थेत जे चालू आहे तेच पुन्हा चालूच राहतील. कार्यकर्त्यांच्या अपेक्षेनुसार मी बदल घडवून आणेन.

आम्हाला कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे: थरूर

नागपुरात पत्रकारांशी बोलताना खासदार शशी थरूर म्हणाले की, ‘मोठे’ नेते स्वाभाविकपणे इतर ‘मोठ्या’ नेत्यांच्या पाठीशी उभे असतात, परंतु त्यांना राज्यांतील पक्ष कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे.

आम्ही मोठ्या नेत्यांना मान देतो, पण पक्षातील तरुणांचे ऐकण्याची वेळ आली आहे, असे ते आवर्जून म्हणाले. पक्षाच्या संघटनात्मक रचनेत बदल करण्याचे काम आम्ही करणार असून कार्यकर्त्यांना देखील महत्त्व दिले पाहिजे.

खरं तर, शशी थरूर हे देखील G-23 गटाचा भाग होते, ज्यांनी 2020 मध्ये पक्षात संघटनात्मक बदल आणि निवडणुकांची मागणी केली होती.

गांधी कुटुंबाला कोणीही ‘गुडबाय’ म्हणणार नाही

शनिवारी, पक्षाध्यक्ष निवडीनंतर गांधी कुटुंबाच्या भूमिकेबद्दल विचारले असता, शशी थरूर म्हणाले होते, “गांधी कुटुंबाचा आणि काँग्रेसचा डीएनए एकच आहे, त्यांना ‘गुडबाय’ म्हणायला कोणी मूर्ख नाही. गांधी कुटुंबाला ‘गुडबाय’ म्हणावे एवढा कोणताही अध्यक्ष ‘मूर्ख’ नाही. ती आमची खूप मोठी संपत्ती आहे”

तत्व आणि विचारधारेसाठी मी लहानपणापासून लढतोय : खरगे

दुसरीकडे, रविवारीच पत्रकार परिषद घेताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, ‘एक व्यक्ती, एक पद’ या सूत्रानुसार मी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

माझ्या 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल तुम्हाला माहिती आहे. मी लहानपणापासून आजपर्यंत तत्व आणि विचारधारेसाठी लढत आलो आहे.

माझ्या आयुष्यात लहानपणापासून संघर्ष आहे. वर्षानुवर्षे मंत्री होतो आणि विरोधी पक्षनेताही होतो. घराघरात भाजप आणि संघाच्या विचारसरणीविरोधात लढा दिला आहे. मला पुन्हा लढायचे आहे आणि कॉंग्रेसची तत्वे लढून पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे.

1939 मध्ये पहिल्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली

>> काँग्रेस अध्यक्षपदासाठी पहिली गंभीर लढत 1939 मध्ये सुभाषचंद्र बोस आणि पट्टाभी सीतारामय्या यांच्यात झाल्याचे रेकॉर्डवरून दिसून येते. नंतर गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस नेत्यांनी पाठिंबा दिला, पण बोस विजयी झाले.

>> 1950 मध्ये या पदासाठी पुन्हा निवडणूक नाशिक अधिवेशनापूर्वी जेबी कृपलानी आणि पुरुषोत्तम दास टंडन यांच्यात लढली गेली. टंडन विजयी झाले परंतु नंतर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला.

>> नेहरूंनी 1951 ते 1955 दरम्यान पक्षप्रमुख आणि पंतप्रधान या दोन पदांवर काम केले. नेहरूंनी 1955 मध्ये काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले आणि यूएन ढेबर त्यांच्यानंतर आले.

>>  1947 ते 1964 आणि पुन्हा 1971 ते 1977 या काळात बहुतेक पक्षाचे अध्यक्ष पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. 1997 मध्ये, सीताराम केसरी यांनी प्रतिस्पर्धी शरद पवार आणि राजेश पायलट यांचा पराभव करून काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली.

>> त्यानंतर केसरी यांना मार्च 1998 मध्ये CWC च्या ठरावाद्वारे अध्यक्षपदावरून हटवण्यात आले आणि एक वर्ष अगोदर AICC च्या प्राथमिक सदस्य झालेल्या सोनिया गांधी यांना अध्यक्षपद स्वीकारण्याची ऑफर देण्यात आली. 6 एप्रिल 1998 रोजी सोनिया औपचारिकपणे अध्यक्ष म्हणून निवडून आल्या.

>> नंतर 2017-2019 मध्ये ब्रेक घेतला. सोनिया या सर्वात जास्त काळ पक्षाच्या नेत्या आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

हे देखील वाचा