Latur News : अहमदपूर- उदगीर रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

Latur News

Latur News : उदगीर (जिल्हा लातूर) तालुक्यातील सुकणी येथील एक व्यक्ती रात्री अहमदपूर-उदगीर रस्त्यावरून पायी जात असताना मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली.

यामध्ये पादचाऱ्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुरुवारी रात्री अज्ञात वाहनचालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, सुकणी येथील सटवा दत्तू गोटमुकळे (वय 49) बुधवारी रात्री 8 ते 8.30 च्या दरम्यान बंद असलेल्या ढाब्यावर राखणदारी करण्यासाठी झोपायला जात होते.

दरम्यान, अहमदपूर-उदगीर मुख्य रस्त्यावर सुकणी ते वाढवणा पाटी दरम्यान मागून अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात तो गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी मयताचा भाऊ राजकुमार गोटमुकले यांच्या फिर्यादीवरून गुरुवारी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.