मुंबई, 13 मे : मशिदींतील भोंग्यावरुन वातावरण तापले असताना एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसीनी औरंगजेबाच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गुरुवारी औरंगाबादेत आले होते.
त्यामुळे शिवसेनेसह अन्य राजकीय पक्षांनी ओवेसींवर निशाणा साधला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ओवेसींना थेट इशाराच दिला आहे. ‘तुम्हाला त्याच कबरीत पुरणार’ असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन हा विधी असू शकत नाही. ओवेसीने वारंवार संभाजीनगरला यायचे आणि औरंगजेबाच्या थडग्यासमोर गुडघे टेकायचे. यावरून महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचे काही असेल तर ते ओवेसींचे ‘राजकारण’ दिसत आहे.
मी एवढेच म्हणेन की औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीत मराठ्यांनी बांधली. आम्ही त्याला याचं पुरले. या मुघल राजाने महाराष्ट्रावर आक्रमण केले, अत्याचार केले.
Dargha Hazrath Aurangzeb Alamgir (R.A) pic.twitter.com/tOvwmUoNeN
— Akbaruddin Owaisi (@imAkbarOwaisi) May 12, 2022
त्याची मराठ्यांनी याच मातीत कबर बांधली आणि तुम्ही कबरीवर येऊन नमाज पढत आहेत, तुम्हाला याचं मातीत आणि त्याच कबरीत जावं लागेल.
औरंगजेब मोठा संत नव्हता, तो आक्रमक होता. त्याने महाराष्ट्रावर स्वारी केली. त्यांनी महाराष्ट्रातील मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त केली.
आता महाराष्ट्रात येऊन त्याच औरंगजेबाच्या कबरीवर प्रार्थना करणं, हे महाराष्ट्राला आव्हान देण्यासारखं आहे. बरं आम्ही आव्हान स्वीकारले.
औरंगजेबाला आपण याच मातीत गाडले होते. जे औरंगजेबाचे भक्त राजकारण करत आहेत त्यांचीही अशीच अवस्था होईल, असेही संजय राऊत म्हणाले.
अकबरुद्दीन ओवेसी यांची राज ठाकरेंवर जोरदार टीका
मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी औरंगाबादेत जाहीर सभा घेतली होती.
या पार्श्वभूमीवर ओवेसी यांनी औरंगाबादमध्ये राज ठाकरेंवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता अत्यंत तिखट शब्दात टीका केली.
#AkbaruddinOwaisi #Sanjay Raut #Shivsena #RajThakrey #Aurangzeb