Pune PFI News : ‘पीएफआय’चे बेकायदेशीर आंदोलन; पुण्यातील 60 ते 70 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल 

Pune PFI News: पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) पदाधिकाऱ्यांना दहशतवादविरोधी पथकाने अटक केली. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेकायदेशीर निदर्शने केली.

या आंदोलनाला बंड गार्डन पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र तरीही पीएफआयच्या समर्थकांनी एकत्र येऊन बेकायदेशीर आंदोलन केले. परवानगीशिवाय आंदोलन केल्यामुळे पोलिसांनी 60-70 पीएफआय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

रियाज जैनुद्दीन सय्यद (वय 26, शिवनेरी नगर कोंढवा खुर्द) याच्यासह 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार नवनाथ डांगे यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Pune PFI News : Illegal movement of 'PFI'; A case has been registered against 60 to 70 activists in Pune

पोलिसांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांना केवळ चार जणांसोबत जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र हळूहळू कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमा झाले.

शुक्रवारी दुपारी तीन वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य गेटसमोर व बोल्हाई चौकात जमा झाले. त्यांनी तेथे रास्ता रोको केला. त्यामुळे चौकात वाहतूक कोंडी झाली होती.

प्रत्येक कार्यकर्ता इतर कार्यकर्त्यांना फोन करून बोलावत होता. जमावाकडून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली.

अब्दुल कय्युम शेख, रजी अहमद खान या दोघांना अटक

दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवल्याच्या संशयावरून राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने कोंढवा येथील पीएफआयच्या कार्यालयावर छापा टाकला.

त्यात पुण्यातील पीएफआयच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. अब्दुल कय्युम शेख आणि रजी अहमद खान अशी या दोघांची नावे आहेत.

राज्यस्तरीय कार्यकर्त्यांच्या अटकेचा निषेध करत घोषणाबाजी करत वाहनांची अडवणूक केली. कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन केले नाही. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत काही कामगारांना ताब्यात घेत नोटीस देऊन सोडून दिले.

एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले

एनआयए, ईडीसह स्थानिक तपास यंत्रणांनी देशभरातील पीएफआयच्या कार्यालयांवर छापे टाकले. केरळमध्येच 50 ठिकाणी छापे टाकण्यात आले.

त्याशिवाय कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये छापे टाकण्यात आले. काही राज्यांमध्ये पीएफआयचे अधिकारी आणि कार्यकर्त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. काहींना अटकही झाली आहे.