Crime News : शिक्षक प्रियकराच्या मदतीने आजारी पतीला संपवले; फिर्यादी पत्नीच निघाली आरोपी

0
156
Murder

Chandrapur Crime: चंद्रपूर शहरात धक्कादायक खुनाची घटना उघडकीस आली आहे. एका पत्नीने आपल्या शिक्षक प्रियकराच्या मदतीने आपल्या आजारी पतीची हत्या केली आहे.

मनोज रासेकर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. चंद्रपूर शहरातील बालाजी वार्डात राहणाऱ्या 44 वर्षीय मनोज रासेकर यांचा गळा दाबून खून करण्यात आला.

मनोज हा टॅक्सी चालक असून काही अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून दरोडा टाकून मनोजची हत्या केल्याची तक्रार त्याच्या पत्नीने केली होती.

पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला आणि नंतर जे सत्य समोर आले ते धक्कादायक आहे. पोलिस तपासात पत्नीच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मृत मनोजच्या पत्नीचे स्वप्नील गावंडे नावाच्या शिक्षकाशी प्रेमसंबंध होते. अनेकदा आजारी असणारा तिचा नवरा यात अडथळा ठरत होता.

Mild Earthquakes | लातूरातील गूढ आवाजाचे दिल्लीहून आलेल्या तज्ञांनी सांगितले ‘हे’ कारण !

दोघांनीही पतीचा काटा काढण्याचा कट रचला. त्यानुसार रात्री मनोजच्या पत्नीने घराचा दरवाजा उघडा ठेवला. आरोपी शिक्षकाचा प्रियकर घरात घुसला. त्याने उशीने चेहरा झाकून मनोजची हत्या केली.

मात्र आरोपींनी प्लॅन ‘बी’ वापरून घटनेला दरोड्याचे स्वरूप दिले. मात्र, संपूर्ण घटनाक्रम समजून घेतल्यानंतर पोलिसांनी मोबाईल कॉल डिटेल्स आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवली.

या खुनाच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी शिक्षक चंद्रपूर येथील एका नामांकित शाळेत शिक्षक आहे. या शिक्षकाचे आणि मृताच्या पत्नीचे अनैतिक संबंध होते.

Maulana Jarjis Rape Case : मौलाना जरजीस बलात्कार प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा आणि 10 हजारांचा दंड

त्यांच्या प्रेमसंबंधात मनोज अडथळा ठरत होता. मनोजही काही दिवसांपासून आजारी होता. त्यामुळे दोघांनी त्याला मारण्याचा कट रचला. त्याचा खून केल्यानंतर आरोपीच्या पत्नीने दरोडा टाकून खून झाल्याचे नाटक केले.

शिवाय, त्यांनी पोलिसांकडेही अशीच तक्रार केली होती. मात्र, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून काही माहितीच्या आधारे तपास केला.

महिलेचे तिच्याच मुलीच्या शाळेतील शिक्षकासोबत प्रेमसंबंध होते. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा शिक्षक प्रियकराच्या मदतीने खून केला, मात्र पोलिसांनी 24 तासांच्या आत या गुन्ह्याचा भंडाफोड केला.

हे देखील वाचा