Crime News : दारूच्या नशेत निर्दयी पित्याने 8 वर्षांच्या मुलीवर झाडली गोळी ; मुलीची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू

Crime News :

Crime News : दारू पिऊन पती घरी आल्यावर कौटुंबिक कारणावरून पत्नीशी जोरदार वाद झाला. त्यानंतर पतीने थेट जवळील पिस्तूल काढून पत्नीला मारण्यासाठी तिच्या दिशेने रोखले.

मात्र, यादरम्यान त्यांची जवळ उभी असलेली आठ वर्षांची मुलगी हात जोडून ‘आईला मारू नका, पप्पा’ असे म्हणत पित्याला रोखण्यासाठी विनवणी करीत आड आली.

तेव्हा या निर्दयी पित्याने दुसरा विचार न करता मदतीची याचना करणाऱ्या चिमुकलीच्या पोटात गोळी झाडली. या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली आहे. राजनंदिनी पांडुरंग उभे असे जखमी मुलीचे नाव असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Pune PFI News : ‘पीएफआय’चे बेकायदेशीर आंदोलन; पुण्यातील 60 ते 70 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल 

ही घटना पुण्यातील नर्‍हे येथे घडली असून पांडुरंग तुकाराम उभे (वय 38, रा. रुद्रांगण सोसायटी, नर्‍हे, पुणे) याच्याविरुद्ध सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिस्तूल परवानाधारक

पांडुरंग बढे यांचा बांधकाम व्यवसाय आहे. त्याने परवाना असलेली रिव्हॉल्व्हर घेतली आहे. सध्या त्यांचा व्यवसाय मंदीत असून तो आर्थिक अडचणीत आहे. त्याला दारूचे व्यसन जडले आहे.

शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बांधकाम व्यावसायिक पांडुरंग हा दारूच्या नशेत घरी आला आणि त्याने पत्नीसह घरातील इतरांशी किरकोळ कारणावरून वाद सुरू केला.

छातीत गोळी लागली

आईच्या जीवाला धोका असल्याचे पाहून आठ वर्षांची राजनंदिनी ओरडत आली. आईला मारू नका बाबा, असे म्हणत तिने वडिलांकडे विनवणी केली.

मात्र, मुलीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून निर्दयी वडिलांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता दारूच्या नशेत राजनंदिनीवर गोळी झाडली. गोळी राजनंदिनीच्या छातीच्या उजव्या बाजूला लागली. ती जागीच कोसळली.

यावेळी गोळीबाराचा आवाज ऐकून शेजारी तात्काळ तिथे आले. राजनंदिनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून त्यांनी तिला तातडीने भारती रुग्णालयात नेले. तिथे तिच्यावर उपचार सुरु आहेत.

गुन्हा दाखल केला

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त रुक्मिणी गलांडे, पोलिस निरीक्षक शैलेश संखे, जयंत राजूरकर, सहायक पोलिस निरीक्षक राहुल यादव, प्रवीण जाधव, पोलिस उपनिरीक्षक सचिन निकम, अस्मिता लाड, अशोक सणस आदींनी धाव घेतली. पोलिस आयुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी होते

गंभीर जखमी मुलीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पांडुरंग उभे याच्याविरुद्ध सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.