Home Blog Page 307

मंगळुरूतील मशिदीखाली मंदिराचे अवशेष सापडले; विहिंप-बजरंग दल आक्रमक, कलम 144 लागू

मंगळुरू : वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा सध्या तापलेला असतानाच कर्नाटकातील जुमा मशिदीखाली मंदिराचे अवशेष सापडल्याचा दावा करण्यात आला आहे.

यानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने या भागात कलम 144 लागू करण्यात आले असून पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.

मंगळुरूपासून काही अंतरावर मलाली येथील जुमा मशिदीच्या डागडुजीचे काम सुरू आहे. 21 एप्रिल रोजी डागडुजीदरम्यान मशिदीखाली मंदिराचे अवशेष सापडले.

हे अवशेष सापडल्यामुळे पूर्वी या ठिकाणी हिंदू मंदिर होते, असा दावा केला जात आहे. विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) नेत्यांनी जिल्हा प्रशासनाकडे यासंदर्भात धाव घेतली असून, कागदोपत्री सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय या ठिकाणचे काम थांबवण्यात यावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली.

हा वाद न्यायालयामध्ये पोहोचला असून न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत डागडुगीचे काम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मशिदीखाली मंदिराचे अवशेष सापडल्यापासून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक झाले आहे.

आज हिंदू संघटनांकडून रामांजनेय भजना मंदिरामध्ये धार्मिक विधीचे आयोजन करण्यात आले होते. या विधीसाठी मोठ्या संख्येने हिंदू बांधव जमा झाला होता.

त्यामुळे मशिद आजूबाजूच्या परिसरामध्ये कमल 144 लागू करण्यात आले होते आणि नागरिकांनी शांतता राखावे असे आवाहन पोलिसांनी केले.

याबाबत अधिक माहिती देताना मंगळुरूचे पोलीस आयुक्त एन. एस. कुमार यांनी सांगितले की, परिस्थिती नियंत्रणात असून शहरामध्ये शांतता आहे.

हिंदू संघटनेने आज सकाळी साडे आठ वाजता मंदिरामध्ये एका विधीचे आयोजन केले होते. हा विधी अकरा वाजेपर्यंत चालला.

अनुचित प्रकार टाळण्यासाठी आवश्यक तेथे फौजफाटा तैनात करण्यात आला असून ग्रामस्थांनीही दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले असून दोन्ही पक्षांनी पुढील लढा न्यायालयात लढण्याचे मान्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.

सर्वेची मागणी

दरम्यान, विहिंप आणि बजरंग दलाच्या मागणीनंतर प्रशासनाने तातडीने या जमिनीसंदर्भातील कागदोपत्री पडताळणी सुरू केली असून लोकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

जमिनीची नोंद ठेवणारा विभाग आणि वफ्फ बोर्डाकडून माहिती घेणार आहोत, असे दक्षिण कानडाचे उपायुक्त राजेंद्र के. व्ही. यांनी सांगितले.

ज्ञानवापी मशिदीत मुस्लिमांना प्रवेश न देण्यासाठी याचिका

नवी दिल्ली : ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात मुस्लिमांना प्रवेश देऊ नये व हिंदूंना शिवलिंगाची पूजा करू द्यावी, अशी मागणी करणारी याचिका बुधवारी सत्र न्यायालयाकडून जलदगती न्यायालयाकडे स्थलांतरित करण्यात आली.

यावर येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे. विश्व वैदिक सनातन संघाने सत्र न्यायाधीश रवीकुमार दिवाकर यांच्या न्यायालयात बुधवारी ही याचिका दाखल केली होती.

न्या. दिवाकर यांनी ज्ञानवापी मशिदीबद्दलच्या याचिकेवरील सुनावणी घेतली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ती जिल्हा सत्र न्यायाधीश अजय कुमार विश्वेश यांच्याकडे स्थलांतरित करण्यात आली.

 

Maharashtra Crime | महाराष्ट्रातील प्रसिद्ध डॉ. देवानंद जाजू यांची झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या, शहरात प्रचंड खळबळ

नांदेड : Maharashtra Crime | नांदेड शहरातील प्रसिद्ध डॉ. देवानंद जाजू (Dr. Devananda Jaju) यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन (Taking Sleeping Pills) आपलं आयुष्य संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

डॉ. जाजू यांच्या आत्महत्येची (Commits Suicide) घटना समोर आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

जाजू हे शहरातील प्रसिद्ध जाजू हॉस्पिटलचे प्रमुख (Jaju Hospital) होते. तसेच ते भाजपच्या (BJP) वैद्यकीय आघाडीचे प्रमुख (Medical Lead Head) होते.

जाजू यांनी आत्महत्या का केली ? याची माहिती अद्याप समजू शकली नाही. नांदेडचे (Nanded Crime) ग्रामीण पोलीस (Nanded Rural Police) याप्रकरणी तपास करत असून तपासाअंती सत्य बाहेर येईल असे पोलिसांनी सांगितले. (Maharashtra Crime)

डॉ. देवानंद जाजू हे मागील 20 ते 25 वर्षापासून नांदेड शहरातील (Nanded Crime) सिडको भागात (CIDCO) वैद्यकीय सेवा देत होते. त्यांचे रुग्णालय आणि निवासस्थान एकाच ठिकाणी आहे.

त्यांच्या पत्नीदेखील डॉक्टर आहे. पण त्या मुलींच्या शिक्षणासाठी बाहेरगावी राहतात. तर डॉ. जाजू हे नांदेड मध्ये राहत होते.

दरम्यान आज दुपारी नांदेड ग्रामीण पोलिसांना डॉ. जाजू यांच्या आत्महत्येची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी डॉ. जाजू यांचा मृत्यू झाला होता.

डॉ. जाजू यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मात्र, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. जाजू यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात (District Hospital) पाठवला आहे.

शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर त्यांच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती समोर येईल. डॉ. जाजू हे वैद्यकीय, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

‘प्री वेडिंग’साठी गोव्यात जाऊन रात्रभर सोबत राहिल्यानंतर वराने लग्न मोडले; कारण ऐकून थक्क व्हाल!

Buldhana News : लग्नाआधी प्री वेडिंग फोटोशूट करण्याची नवी प्रथा सध्या रूढ होऊ लागली आहे.

लग्नाच्या आधी होणारे नवरा-नवरी फोटोशूट करून घेतात. पण अशाच एका फोटोशूटमुळे बुलढाण्यातील एक युवती संकटात सापडली आहे.

लग्न ठरलेल्या युवक व युवतीने गोवा येथे ‘प्री वेडिंग’ केल्यानंतर ते हॉटेलमध्ये रात्रभर सोबत राहिले.

पण सकाळी नियोजित वराने ‘मला जशी मुलगी हवी, तशी तू नाहीस’ असे कारण सांगून लग्न मोडत असल्याचे तरुणीला सांगितले.

या प्रकारामुळे तरूणीसह तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

नेमकं घडलं काय?

बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील एक गावातल्या २० वर्षीय तरुणीचे तालुक्यातीलच २५ वर्षीय अभियंता तरुणाशी लग्न ठरले होते.

दोघांचा जानेवारी महिन्यात साखरपुडा झाला. तेव्हापासून दोघांमध्ये चांगले संभाषण सुरू होते.

एप्रिल महिन्यात तरुण-तरुणी, तिची एक मैत्रीण आणि एक छायाचित्रकार हे कारने गोव्याला ‘प्री वेडिंग’ शूट साठी गेले होते.

‘प्री वेडिंग’ शूट केल्यानंतर रात्री त्यांनी एका हॉटेलमध्ये मुक्काम केला. तरुण-तरुणी रात्री एकाच खोलीत थांबले होते.

मात्र सकाळी उठल्यावर तरुणाने गोंधळ घालून ‘मला जशी मुलगी हवी होती, तशी तू नाही’ असं तरुणीला सांगितलं.

यावेळी तरुणाने कपडे फाडून मोबाईल देखील फोडला. या प्रकारामुळे तरुणी घाबरली. घरी आल्यावर तिने आई-वडिलांना घडलेला सविस्तर प्रकार सांगितला.

चर्चा करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न सुरू!

दरम्यान, या सगळ्या प्रकारामुळे अधिक गंभीर समस्या उद्भवण्याच्या विचाराने कुटुंबीयांनी तक्रार देण्याचे टाळून आपापसात सामाजिक स्तरावर प्रकरणाचा निपटारा करण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूने सुरू केले आहेत.

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, संशयित पती फरार; जत तालुक्यातील घटना

जत : चारित्र्याच्या संशयावरून एकाने बेडग्याने डोक्यात मारून पत्नीचा खून केल्याची घटना जत तालुक्यातील जालिहाळ बुद्रुक येथे येथे घडली आहे. केशराबाई बाळासाहेब सावंत (वय ४३) असे मृत महिलेचे नाव आहे.

घटनेनंतर संशयित पती बाळासाहेब संदीपान सावंत फरार झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.

मृत केशरबाई सावंत भाजीपाला विकत असत. आसपासच्या गावांमधील बाजाराच्या दिवशी भाजीपाला जाऊन विकण्याचा त्यांचा व्यवसाय होता, तर पती बाळासाहेब शेती बघतो.

या दाम्पत्याला सात एकर शेती असून, त्यात भाजीपाला लावण्यात आला होता.

बाजारहाट करण्यासाठी केशरबाई बाहेरगावी फिरत असल्याने बाळासाहेब वारंवार चारित्र्यावर संशय घेत होता.

या वादातून दोघांमध्ये सारखे खटके उडत. या कारणातूनच मंगळवारी सकाळी त्यांच्यात पुन्हा एकदा भांडण झाले.

रागाने पेटलेल्या बाळासाहेबने जमीन खोदण्याचे बेडगे केशरबाई यांच्या डोक्यात घातले. डोळ्याच्या व कानाच्या मध्ये घाव घातल्याने केशरबाई यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर बाळासाहेब सावंत फरार झाला आहे. या दोघांना तीन मुली आहेत.

एका मुलीचे लग्न झाले असून, दुसऱ्या मुलीसाठी स्थळ बघणे सुरू होते.

याप्रकरणी बाळासाहेब याच्याविरुद्ध उमदी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

लातूर मनपा सचिव अश्विनी देवडेंवर हलगर्जीपणाचा ठपका, आयुक्तांकडून निलंबनाची धडक कारवाई

लातूर : महापालिकेची मुदत संपण्यापूर्वी घेण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेसाठी काढलेल्या विषय पत्रिकेत हलगर्जीपणाचा ठपका ठेवत नगरसचिव अश्विनी देवडे यांना निलंबित करण्यात आले आहे.

या संदर्भात महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमन मित्तल यांनी आदेश दिले आहेत. सचिव अश्वनी देवडे यांना यापूर्वी कारवाईच्या संदर्भाने प्रारंभी नोटीस बजावली.

त्याचा खुलासा २४ तासात मागवला होता. मात्र खुलासा समाधानकारक नसल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले.

लातूर महापालिकेची पंचवार्षिक मुदत २१ मे रोजी संपण्याच्या एक दिवस आधी २० मे रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती.

विशेष सभा २० मे रोजी असताना त्याची विषय पत्रिका १० मे रोजी काढण्यात आली होती. विषय पत्रिका महापालिकेच्या सदस्यांना १८ मे रोजी म्हणजे आठ दिवसांनी उशिरा देण्यात आली.

विशेष सभेच्या आयोजनात हलगर्जीपणाचा ठपका

महापालिकेच्या या विषय पत्रिका वितरणाच्या कामात व विशेष सभेच्या आयोजनात हलगर्जीपणा झाल्याची बाब निदर्शनास आल्याने शिस्तभंग झाल्याचे आढळून आले आहे.

त्यामुळे आपणावर कारवाई का करण्यात येऊ नये, यासंबंधी २४ तासाच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.

समाधानकारक खुलासा सादर न केल्यास नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल असेही त्यात कळवले होते.

रोजची उपस्थिती बंधनकारक, विनापरवाना मुख्यालय सोडता येणार नाही

यानुसार नगरसचिव अश्विनी देवडे यांच्याकडून सादर केलेला खुलासा समाधानकारक न वाटल्याने आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला.

तसेच मनपा सचिव अश्विनी देवडे यांना निलंबित करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अमन मित्तल यांनी घेतला आहे.

निलंबनाच्या आदेशात त्यांना विनापरवाना मुख्यालय सोडता येणार नाही व रोजची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे.

जालना रोडवर बस-पिकअपचा भीषण अपघात; ५ जण जागीच ठार, तिघे गंभीर जखमी

औरंगाबाद : औरंगाबाद- जालनारोडवरील गाढे जवळगाव फाट्यावर बस- आणि पिकअपच्या भीषण अपघातात ५ जण जागीच ठार झाले.

तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, भरधाव वेगाने एक पिकअप जीप ( एमएच २१ बीएच ४३३१) जालन्याकडून औरंगाबादच्या दिशेने येत होती.

गाढे जालना रोडवरील जवळगाव फाट्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप अचानक दुभाजकावर चढून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस गेली.

याच दरम्यान जालन्याकडे जाणारी पुणे-कळमनुरी बस समोर आली. बस चालकाने प्रसंगावधान राखत डाव्या बाजूला बस घेतली. मात्र, पिकअप बसवर आदळली.

यात चार जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर तिघे जण गंभीर जखमी आहेत.

मृतांची संख्या आणखी वाढू शकते असा प्रत्यक्षदर्शींचा अंदाज आहे.

अपघात एवढा भीषण होता की पिकअपचा समोरील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे.

माहिती मिळताच करमाड पोलिसांनी लागलीच अपघातस्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले.

जखमींना उपचारासाठी औरंगाबादकडे रवाना करण्यात आल्याची माहिती आहे.

अपघातामुळे जालना रोडवरील दोन्ही बाजूची वाहतूक प्रभावित झाली होती. पोलीसांनी प्रयत्नपूर्वक वाहतूक सुरळीत केली.

मृतांची नावे अशी आहेत :
1. लहू ज्योतीराम राठोड (वय 50 वर्ष राहणार रेणुका नगर औरंगाबाद)
2. अशोक जयसिंग चव्हाण (राहणार सातारा तांडा)
3. चव्हाण रणजित जयसिंग चव्हाण (राहणार सातारा तांडा)
4. शांतीलाल हरी चव्हाण (राहणार सातारा तांडा)
5. लता उर्फ पारूबाई ज्ञानेश्वर जाधव (राहणार राज नगर बीड बायपास, औरंगाबाद)

जखमींची नावे :
6. विकास ढेरे
7. रोहित विकास ढेरे
दोघे राहणार गुरु लॉन्सच्या पाठीमागे बीड बायपास, औरंगाबाद

जजसाहेब, बायको बॅटनं दररोज मारते, सुरक्षा द्या; CCTV फुटेज घेऊन मुख्याध्यापक कोर्टात

Judge, the wife beats every day with the bat, give protection; Headmaster in court with CCTV footage

अलवर: राजस्थानच्या अलवरमधील भिवाडी येथे राहणाऱ्या एका मुख्याध्यापकाला न्यायालयानं सुरक्षा पुरवली आहे. विशेष म्हणजे ही सुरक्षा गुंडांपासून बचाव व्हावा किंवा गुन्हेगारांपासून संरक्षण व्हावं यासाठी देण्यात आलेली नाही.

पत्नीपासून संरक्षण व्हावं यासाठी न्यायालयानं सुरक्षा पुरवली आहे. मुख्याध्यापकाची पत्नी दररोज मारहाण करत असल्यानं न्यायालयानं हा निर्णय घेतला.

गेल्या वर्षभरापासून मुख्याध्यापक पत्नीचा त्रास, मारहाण सहन करत आहेत. अतिरेक झाल्यानं अखेर त्यांनी घरात सीसीटीव्ही लावले. मात्र तरीही पत्नीनं मारहाण सुरूच ठेवली. हे फुटेज घेऊन मुख्याध्यापक न्यायालयात गेले.

त्यांनी सुरक्षा देण्याची मागणी केली. न्यायाधीशांनी व्हिडीओ पाहून प्रकरणाची दखल घेतली. मुख्याध्यापकांना तातडीनं सुरक्षा द्या, असे आदेश न्यायमूर्तींनी पोलिसांना दिले.

मुख्याध्यापकांनी न्यायालयाला दिलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पत्नी बॅटनं मारहाण करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

घटना अलवरमधील भिवाडी येथील आहे. मुख्याध्यापक अजित यादव यांनी सोनीपत येथील एका तरुणीशी प्रेम विवाह रचला. लग्नानंतरचे काही दिवस चांगले गेले.

मात्र त्यानंतर पत्नीनं अत्याचार सुरू केले. दिवसागणिक मारहाण वाढू लागली. यानंतर पीडित मुख्याध्यापकानं भिवाडी न्यायालयात धाव घेत सुरक्षा देण्याची मागणी केली. त्यानंतर आता पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेसाठी आदेश काढला आहे.

अजित यादव यांचा विवाह ७ वर्षांपूर्वी सोनीपतमध्ये वास्तव्यास असलेल्या सुमन यांच्याशी झाला. लग्नानंतर सुमनचा स्वभाव बदलला. आधी शांत असलेली सुमन आक्रमक बनली.

ती अजित यादव यांना त्रास देऊ लागली, त्यांच्यावर अत्याचार करू लागली. क्रिकेट बॅट, जेवणाच्या तव्यानं तिनं अजित यादव यांना अनेकदा मारहाण केली.

Also Read

Mumbai Crime: मुलुंडमध्ये ६ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी शाळेतील शिपायाला अटक

Mumbai Crime: Schoolboy arrested for raping 6-year-old girl in Mulund

School Peon Arrested for Raping 6-Year-Old Girl : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे शाळा बंद असल्या तरी काही कर्मचारी काम करतात. सोमवारी दुपारी मुलुंड पूर्व शाळेतील शिपायाला मुलगी एकटीच खेळताना दिसली.

नवघर पोलिसांनी शाळेच्या आवारात एका ६ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ५१ वर्षीय शिपायाला सोमवारी रात्री अटक केली आहे. घटनेपूर्वी मुलगी खेळाच्या मैदानावर होती.

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे शाळा बंद असल्या तरी काही कर्मचारी काम करतात. सोमवारी दुपारी मुलुंड पूर्व शाळेतील शिपायाला मुलगी एकटीच खेळताना दिसली.

पोलिसांनी सांगितले की, त्याने तिला बोलावले आणि खोलीत नेले. “आरोपी, हेमंत वैती (51) याने दरवाजा बंद करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

तिने याबद्दल कोणाशीही बोलल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देखील त्याने तिला दिली होती,” असे नवघर पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

मुलगी घरी गेली आणि गप्प बसली. तिच्या आईने तिला तिच्या गप्प राहण्याचे कारण विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला.

तिच्या आईने तत्काळ मुलीच्या वडिलांना कळवले, त्यांनी दोघांनाही नवघर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी नेले. “आम्ही तक्रार नोंदवली आणि आरोपीला अटक केली,” असे परिमंडळ ७चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी सांगितले.

वैतीला मंगळवारी मुलुंड न्यायालयात हजर केले असता ३० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी त्याच्या कुटुंबासह राहतो. त्याने यापूर्वी असे गुन्हे केले आहेत का, याचा शोध घेण्यासाठी पोलीस त्याची चौकशी करणार आहेत.

Also Read

 

 

Yasin Malik : यासिन मलिकला अखेर जन्मठेप, टेरर फंडिंग प्रकरणात पटियाला हाऊस कोर्टाचा मोठा निर्णय

Yasin Malik: Yasin Malik finally sentenced to life imprisonment, Patiala House Court's big decision in terror funding case

नवी दिल्ली : संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या टेरर फंडिग (Terror Funding) प्रकरणात जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा नेता यासिन मलिकला (Yasin Malik) शिक्षा सुनावण्यात आली आहे.

टेरर फंडिग प्रखरणात दोषी आढळलेला JKLF प्रमुख यासिन मलिकला आज जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. यासिन मलिकला कलम 120 नुसार 10 वर्षे कारावास आणि कलम 121 नुसार जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

यासिनची रवानगी आता तिहार जेलमध्ये होणार आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं (Patiyala House Court) यासिन मलिकला शिक्षा सुनावली आहे. सुनावणी दरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने यासिन मलिकला फाशी देण्याची मागणी केली होती.

यासीन मलिकला कडक बंदोबस्तात आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. मागील सुनावणीवेळी यासीनला कोर्टानं दोषी ठरवलं होतं. त्यावेळी यासिनने दहशतवाद्यांना पैशांचा पुरवठा केल्याप्रकरणातील सर्व आरोपी स्वीकारले होते.

19 मे रोजी पटियाला हाऊस कोर्टाने विशेष न्यायाधीळ प्रवीण सिंग यांनी मलिकला दोषी ठरवलं होतं. तसंच मलिकच्या आर्थिक स्थितीची माहिती घेऊन त्याला किती दंड आकारला जाऊ शकतो हे ठरवण्याचे निर्देश एनआयएनला दिले होते. त्याचबरोबर कोर्टाने मलिकला त्याच्या मालमत्तेबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासही सांगितलं होतं.

अजून कुणा-कुणावर आरोप निश्चिती?

न्यायालयाने फारुख अहमद दार उर्फ ​​बिट्टा कराटे, मसरत आलम, नईम खान, मोहम्मद युसुफ शाह, शाबीर शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, मोहम्मद अकबर खांडे, बशीर अहमद भट, राजा मेहराजुद्दीन कलवाल, जहूर अहमद शाह वताली, फरार अहमद शाह, फरार अहमद शाह यांना अटक केली होती.

शब्बीर अहमद शाह, अब्दुल रशीद शेख आणि नवलकिशोर कपूर यांच्यासह फुटीरतावादी नेत्यांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

दोषी ठरवल्याबाबत पाकिस्तानकडून निंदा

दुसरीकडे पाकिस्तानने यासिन मलिकला दोषी ठरवल्याबाबत निंदा व्यक्त केली आहे. हुर्रियत आणि जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा नेता यासिन मलिकला 2017 मधील एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आलंय.

हुर्रियतचा नेता यासिन मलिकला 2017 मध्ये एनआयएने दाखल केलेल्या एका बनावट प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे.

मलिकला एकतर्फी प्रकरणात मानवाधिकार कायदा आणि आंतरराष्ट्रीय नागरिक आणि राजनैतिक अधिकार संहितेचं उल्लंघन करत दोषी ठरवण्यात आलं आहे.

इतकंच नाही तर पाकिस्तानवरही निराधार आरोप करण्यात आल्याचा आरोप पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आठवड्याभरापूर्वी केला होता.

17 वर्षांचा असताना पहिल्यांदा जेल

यासीन मलिक हा सध्या तिहार जेलमध्ये आहे. तो जेव्हा पहिल्यांदा जेलमध्ये गेला होता तेव्हा त्याचे वय 17 वर्ष होते. यासीन मलिक याचा जन्म 3 एप्रिल 1966 रोजी श्रीनगरच्या मयसूमामध्ये झाला होता.

मयसूमा हा जम्मू-काश्मीरमधील सर्वात वर्दळीचा परिसर आहे. यासीन मलिक याने आपल्यावरील आरोप स्व:ता मान्य केले आहेत.

तो त्याने केलेल्या गुन्ह्याचे समर्थन करताना म्हणतो की, मी 80 दशकात भारतीय सैन्य दलाने जम्मू-काश्मीरमध्ये केलेला अत्याचार पाहिला होता.

त्यामुळेच मी हातात शस्त्र घेतले. या कथित हिंसाचाराला उत्तर देण्यासाठी जी संघटना यासीन मलिक याने बनवली होती, त्याला त्याने ताला पार्टी असे नाव दिले होते. ही पार्टी राज्यात कायमच अशांतता पसरवण्याचे काम करत होती.

Also Read