ज्ञानवापी मशिदीत मुस्लिमांना प्रवेश न देण्यासाठी याचिका

नवी दिल्ली : ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात मुस्लिमांना प्रवेश देऊ नये व हिंदूंना शिवलिंगाची पूजा करू द्यावी, अशी मागणी करणारी याचिका बुधवारी सत्र न्यायालयाकडून जलदगती न्यायालयाकडे स्थलांतरित करण्यात आली.

यावर येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे. विश्व वैदिक सनातन संघाने सत्र न्यायाधीश रवीकुमार दिवाकर यांच्या न्यायालयात बुधवारी ही याचिका दाखल केली होती.

न्या. दिवाकर यांनी ज्ञानवापी मशिदीबद्दलच्या याचिकेवरील सुनावणी घेतली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ती जिल्हा सत्र न्यायाधीश अजय कुमार विश्वेश यांच्याकडे स्थलांतरित करण्यात आली.