जजसाहेब, बायको बॅटनं दररोज मारते, सुरक्षा द्या; CCTV फुटेज घेऊन मुख्याध्यापक कोर्टात

Judge, the wife beats every day with the bat, give protection; Headmaster in court with CCTV footage

अलवर: राजस्थानच्या अलवरमधील भिवाडी येथे राहणाऱ्या एका मुख्याध्यापकाला न्यायालयानं सुरक्षा पुरवली आहे. विशेष म्हणजे ही सुरक्षा गुंडांपासून बचाव व्हावा किंवा गुन्हेगारांपासून संरक्षण व्हावं यासाठी देण्यात आलेली नाही.

पत्नीपासून संरक्षण व्हावं यासाठी न्यायालयानं सुरक्षा पुरवली आहे. मुख्याध्यापकाची पत्नी दररोज मारहाण करत असल्यानं न्यायालयानं हा निर्णय घेतला.

गेल्या वर्षभरापासून मुख्याध्यापक पत्नीचा त्रास, मारहाण सहन करत आहेत. अतिरेक झाल्यानं अखेर त्यांनी घरात सीसीटीव्ही लावले. मात्र तरीही पत्नीनं मारहाण सुरूच ठेवली. हे फुटेज घेऊन मुख्याध्यापक न्यायालयात गेले.

त्यांनी सुरक्षा देण्याची मागणी केली. न्यायाधीशांनी व्हिडीओ पाहून प्रकरणाची दखल घेतली. मुख्याध्यापकांना तातडीनं सुरक्षा द्या, असे आदेश न्यायमूर्तींनी पोलिसांना दिले.

मुख्याध्यापकांनी न्यायालयाला दिलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पत्नी बॅटनं मारहाण करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

घटना अलवरमधील भिवाडी येथील आहे. मुख्याध्यापक अजित यादव यांनी सोनीपत येथील एका तरुणीशी प्रेम विवाह रचला. लग्नानंतरचे काही दिवस चांगले गेले.

मात्र त्यानंतर पत्नीनं अत्याचार सुरू केले. दिवसागणिक मारहाण वाढू लागली. यानंतर पीडित मुख्याध्यापकानं भिवाडी न्यायालयात धाव घेत सुरक्षा देण्याची मागणी केली. त्यानंतर आता पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेसाठी आदेश काढला आहे.

अजित यादव यांचा विवाह ७ वर्षांपूर्वी सोनीपतमध्ये वास्तव्यास असलेल्या सुमन यांच्याशी झाला. लग्नानंतर सुमनचा स्वभाव बदलला. आधी शांत असलेली सुमन आक्रमक बनली.

ती अजित यादव यांना त्रास देऊ लागली, त्यांच्यावर अत्याचार करू लागली. क्रिकेट बॅट, जेवणाच्या तव्यानं तिनं अजित यादव यांना अनेकदा मारहाण केली.

Also Read