Big Update | महाविकास आघाडी पुन्हा एक झटका, शिंदे सरकारचा प्रभाग रचनेबाबत मोठा निर्णय

devendra_fadanvis_eknath_shinde

मुंबई, 3 जुलै : आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

2017 च्या प्रभाग रचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका घेण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

त्यामुळे महाविकास आघाडीने प्रभाग रचनेबाबत घेतलेले निर्णय रद्द करण्यात आले आहेत. महाविकास आघाडी सरकारने वाढलेली वॉर्ड संख्या बेकायदेशीररीत्या केल्याचा दावा करत तो रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2011 च्या जनगणनेनुसार 2017 मध्ये ठरलेल्या प्रभागांची संख्या यंदाच्या निवडणुकीतही तेवढीच राहणार आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईत महाविकास आघाडीची सत्ता असताना प्रभाग रचनेच्या मुद्द्यावरून राजकीय पक्षांमध्ये मोठा गदारोळ झाला होता.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती. मात्र या प्रभाग रचनेवरून मोठा राजकीय गोंधळ उडाला होता.

विशेष म्हणजे महाविकास आघाडीत फूट पडल्याचे दिसून आले. कारण काँग्रेस नेत्यांनी प्रभाग रचनेवरून शिवसेनेवर जोरदार टीका केली होती.

विशेष म्हणजे प्रभाग रचनेच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेत्यांनीही न्यायालयात धाव घेतली होती. यामुळे महाविकास आघाडी अपयशी ठरली आहे का? अशा चर्चांना उधाण आले होते.

शिवसेनेवर आपल्याच पक्षाच्या फायद्यासाठी प्रभाग निर्माण केल्याचा आरोप होत होता. विशेष म्हणजे काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काल राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुंबईतील प्रभाग रचनेच्या प्रश्नावर चर्चा केली होती.

2017 च्या प्रभाग रचनेनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय आज राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीचे अनेक निर्णय रद्द किंवा स्थगित करण्यात आले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारची पाचवी मंत्रिमंडळ बैठक आज पार पडली.

या बैठकीत प्रभाग रचनेबाबत निर्णय घेण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने काही ठिकाणी नवीन प्रभाग रचना जाहीर केली होती.

मात्र त्यासंदर्भात घेतलेले निर्णय रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीत 2017 प्रमाणेच प्रभाग रचना होण्याची दाट शक्यता आहे.