CM Eknath Shinde : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, 5 ऑगस्टला राजभवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी

eknath_shinde with devendra_fadanavis

मुंबई : नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन महिना उलटला. मग मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? असा सवाल विरोधकांकडून दररोज केला जात आहे. त्यावर टीकाही होत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या भीतीने हे सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार करत नाही, त्यामुळे राज्यातील जनतेची कामे वेळेवर होत नाहीत. हे सरकार बेकायदेशीर आहे.

तसेच, एक दुजे के लिये असेच हा कार्यक्रम या दोघांकडून चालवला जात असल्याची टीका होत असतानाच आता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार ५ ऑगस्टला होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तसेच नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा राजभवनात होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.