Latur News : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह पंधरवाडा दिनांक 6 ते 16 एप्रिल, 2022 या कालावधती साजरा करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत दिनांक नुकतीच यशवंतराव चव्हाण सभागृहात ग्रामीण भागातील विविध महिला बचत गटांचा मेळावा घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर यांनी केले. तसेच मार्गदर्शन करण्यासाठी महात्मा बसवेश्वर समाज कार्य महाविद्यालय,लातूर येथील प्रा. डॉ. संजय गवई उपस्थित होते.
त्यांनी स्वंय सहाय्यता समुह बचत गटातील महिलांना बचत गटाची संकल्पना व कार्यपध्दती अत्यंत मार्मिक शब्दामध्ये सांगितली. स्वंय सहाय्यता समुहामुळे महिलांचा सामाजिक, आर्थिक विकास होवून समाजामध्ये शेतीशी निगडीत कच्च्या मालावर आधारित व्यवसाय सुरु करणे आवश्यक आहे.
तसेच आर्थिक विकास होवून समाजामध्ये प्रतिष्ठा वाढीस आली आहे. तसेच मांजरा कृषी विज्ञान केंद्र, लातूर येथील शास्त्रज्ञ श्रीमती अंजली गुंजाळ यांनी महिलांनी शेतीशी निगडीत कच्च्या मालावर आधारित व्यवसाय सुरु करणे आवश्यक आहे.
तसेच आर्थिक उन्नतीसाठी अन्न प्रक्रियेवर आधारित उद्योगाकडे महिलांनी वाटचाल करावी. सद्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक गावामध्ये एक दालमिल महिला बचत गटामार्फत सुरु करण्यास वाव असल्याचे कृषी संशोधनाच्या निरीक्षणातून दिसून आल्याचे सांगितले.
भारतीय स्टेट बँक व ग्रामीण स्वंयरोजगार प्रशिक्षण संस्था, लातूर येथील प्रशिक्षक सतिष कांबळे यंानी लातूर जिल्ह्यातील विविध बचत गटातील महिलांनी वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक व्यवसायाचे प्रशिक्षण घेवून स्वत:चा व्यवसाय सुरु केल्याचे अनेक उदाहरणे दिली व महिलांनी चौकटीच्या बाहेर येवून स्थानिक स्तरावर जे विकते ते निर्माण करणे गरजचे आहे, असे मत मांडले.
तसेच महिला बचत गट, कबनसांगवीच्या अध्यक्षा श्रीमती ज्योती शिंदे यांनी महिला व मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिनचा उद्योग सुरु केलेला असून 130 महिलांना व्यवसाय उपलब्ध करुन दिला आहे. त्यांना आलेल्या अनेक समस्या व अडअडचणीचे अनुीाव कथन केले.
या कार्यक्रमस उमेद अभियान जिल्हा व्यवस्थापकचे देवकुमार कांबळे, तालुका समन्वयक शिला सरवदे, सुवर्णा भोसले, ज्ञानेश्वरी कउम, संजीवनी नागमोडे तसेच या मेळाव्यात स्वंयसहाय्यता समुह गटाच्या 100 महिला सदस्या उपस्थित होते. समाज कल्याण विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचलन दिव्यांग विभाग प्रमुख राजू गायकवाड यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन शाहुराज कांबळे यांनी मानले, असे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खामितकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.