नवी दिल्ली : सौर वादळ गुरुवारी रात्री पृथ्वीवर धडकण्याची शक्यता आहे. सौर वादळामुळे जगभरातील वीज पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.
सौर वादळे आज पृथ्वीवर धडकण्याची शक्यता आहे. सौर वादळ पृथ्वीवर आदळल्यास जगभरातील वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. नासा आणि नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनने ही माहिती दिली आहे.
सौर वादळ पृथ्वीवर आदळल्यास इलेक्ट्रिकल ग्रीड आणि इतर उपकरणांचे गंभीर नुकसान होऊ शकते. सौर वादळाचा वेग 429 ते 575 किमी प्रति सेकंद असू शकतो. सूर्याच्या पृष्ठभागावर बदल झाल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
सूर्याच्या पृष्ठभागावर मोठ्या स्फोटांमुळे सौर वादळे होतात. या स्फोटामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा सौरमालेत सोडली जाऊ शकते. सौर वादळांचे परिणाम पृथ्वीवर जाणवू शकतात असेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
जास्त उंचीवर याचे परिणाम जाणवू शकतात असे नासाने म्हटले आहे. सौर वादळे रेडिओ सिग्नल्समध्ये व्यत्यय आणू शकतात. त्याशिवाय, काही मध्यम ठिकाणी फारसा परिणाम होणार नाही. मात्र, वीजपुरवठा खंडित होऊ शकतो.