मुंबई : कीर्तनकार सुनीता आंधळे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर सडकून टीका केली आहे. सुनीता अंधारे म्हणाल्या, ज्ञानोबारायांनी रेडा वदवला पण त्या दिवशी तू अनुपस्थित होतास. जिकडे दिसेल तिकडेच फाडून टाकीन असा इशारा देखील दिला आहे.
सुषमा अंधारे यांचा जाहीर निषेध करताना, काही मर्यादा पाळत आहे. माझ्यावर जबाबदारी आहे. तिच्यावर जबाबदारी नाही, ती बरळते म्हणून मी गप्प बसणार नाही, जिथे दिसेल तिथे ठोकीन असा इशाराही त्यांनी दिला. सुषमा अंधारे यांच्या ज्ञानोबांच्या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरु आहेत.
आता कीर्तनकार सुनीता आंधळे यांनी फक्त फाडणे आणि ठोकणे एवढेच शिल्लक असल्याचे म्हटले आहे. कधी कीर्तनाला बसला असता तर थोडी अक्कल आली असती.
श्री संत ज्ञानोबा कोण होते? त्यांच्याबद्दल काय बोलावे? संत आणि संत परंपरा याबद्दल आपल्या लायकीत बोलाव असा सल्लाही दिला आहे.
मी कीर्तनात बोलू शकते. पण, अशी पातळी सोडून खालची भाषा कीर्तनात गादीवरून वापरता येत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ काढल्याचे सुनीता अंधारे यांनी सांगितले.
हनुमंतानी लंकेला उड्डाण केले. मग, तुम्ही या पक्षातून त्या पक्षात उडून गेलात का? संतांच्या स्पर्शाने ही भूमी धन्य झाली आहे. तुम्ही महाराष्ट्रात ज्या पक्षात राहता. त्याला हिंदू धर्माचीचं मते मिळतात.
त्यांच्याबद्दल इतका द्वेष मनात ठेवून बोलते, एवढा तिरस्कार करते, बाई जपून बोल. आमचे संत आणि परंपरा आमचा श्वास आहेत. त्यांचा आदर केला पाहिजे.
सुषमा अंधारे आपल्या देवाबद्दल आणि आपल्या संतांबद्दल बोलते, अशा महिलेला पक्षात ठेवण्याची लाज वाटली पाहिजे, असेही कीर्तन गायिका सुनीता आंधळे यांनी सांगितले. तिला देशाबाहेर किंवा गावाबाहेर हाकलले पाहिजे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
मला हे लोक कीर्तनकार वाटत नाहीत : सुषमा अंधारे
यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, काही लोकांनी मला व्हिडिओ दाखवले. कोणीतरी अतिशय वाईट भाषा वापरली. मुळात मला हे लोक कीर्तनकार वाटत नाहीत.
काम, राग, मोह, मत्सर अजूनही मनातून काढता आले नाही. जे स्वत:ला राजकीय दावणीला बांधतात ते कीर्तनकार होऊ शकत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
सुषमा अंधारे यांच्याविरोधात नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात आला. यापूर्वी ठाणे येथील मुक्ताईनगरमध्ये जोडे मारो आंदोलन करण्यात आले होते. निषेधार्थ प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यात आता सुनीता अंधारे यांची भर पडली आहे.
काय आहे प्रकरण?
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या वारकरी संप्रदायाविषयी केलेल्या भाषणाच्या व्हिडीओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या आहेत.
त्यात अंधारे यांनी संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव यांच्याविषयी केलेल्या विधानांवरुन वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहेत. अंधारे यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागितली असली तरी वारकरी संप्रदाय हे आक्रमक असल्याचे दिसत आहे.
हे देखील वाचा
- भारत चीनच्या सीमेवर लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, ड्रोनची जमवाजमव करत, पुढील ४८ तासांत मोठ्या लष्करी सरावाची तयारी
- Tawang Clash: तवांगमधील चकमकीवर चिनी लष्कराचे वक्तव्य, भारतीय शूरवीरांबद्दल म्हटले …
- Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर अमित शाहांसोबत मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक
- पती ऑनलाइन मसाजर शोधत होता, एस्कॉर्ट साइटवर पत्नी आणि बहिणीचा फोटो आला समोर