पती ऑनलाइन मसाजर शोधत होता, एस्कॉर्ट साइटवर पत्नी आणि बहिणीचा फोटो आला समोर

60
Husband looking masseuse online, came across photo of his wife and sister on an escort site

मुंबई : मुंबईतील खार येथे राहणारी एक व्यक्ती ऑनलाइन साइटवर मसाज थेरपिस्ट शोधत होती. मात्र शोध घेत असताना त्याच्या पायाखालची जमीनचं सरकली.

त्याला समजले की, त्याच्या पत्नी आणि बहिणीचा फोटो चक्क एस्कॉर्ट साइटवर अपलोड केला गेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आता रेश्मा यादव नावाच्या महिलेला अटक केली आहे.

रेश्मा यादव ही त्याच टोळीची सदस्य असल्याचा पोलिसांना संशय आहे, जी एस्कॉर्ट आणि मसाज सातत्यांसाठी सोशल मीडियावर अज्ञात महिलांचे फोटो अपलोड करते.

संबंधित व्यक्तीने एस्कॉर्ट साईटवर पत्नी व बहिणीचा फोटो पाहिल्यानंतर त्याने तत्काळ दोघांनाही माहिती दिली. त्यानंतर पत्नी व बहिणीने संबंधित फोटो 3 ते 4 वर्षे जुने असून त्याचा गैरवापर झाल्याचे निदर्शनास आणून दिले.

ज्या व्यक्तीच्या पत्नी आणि बहिणीचे फोटो अपलोड करण्यात आले होते, त्यांचा फोन नंबर संबंधित साइटवर होता. त्यावर फोन केला आणि समोरून रेशमा यादव नावाच्या महिलेने फोन उचलला. तिने त्याला खार येथील हॉटेलमध्ये भेटीसाठी बोलावले.

तो पत्नी आणि बहिणीसह रेशमा यादवने भेटीसाठी बोलावलेल्या हॉटेलमध्ये पोहोचला. तक्रारदाराची पत्नी आणि बहिणीने रेशमा यादवला फोटोंबाबत विचारणा केली असता, तिने वाद घालण्यास सुरुवात केली.

तेव्हा तिने तेथून पळून जाण्याचाही प्रयत्न केला. त्याचवेळी तिला पकडून पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि संपूर्ण प्रकरण उघड झाले.

पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून रेशमा यादव हिला अटक केली. न्यायालयाने तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

तसेच, सोशल मीडियावर तुमचे फोटो अपलोड करताना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून महत्त्वाची बाब म्हणजे तुमचे प्रोफाईल लॉक करणे.

काय आहे प्रकरण?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार 31 वर्षीय इसम हा खार येथील रहिवासी आहे. एस्कॉर्ट/डेटिंग वेबसाइटवर मसाज थेरपिस्ट शोधत असताना, त्याला त्याच्या पत्नी आणि बहिणीचा फोटो दिसला.

याबाबत तक्रारदाराने दोघांना विचारणा केली असता त्यांनी ही छायाचित्रे त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर ५ वर्षांपूर्वी अपलोड केल्याचे सांगितले.

त्यानंतर तक्रारदाराने वेबसाइटवरील फोटोंवर क्लिक करून मोबाइल क्रमांक मिळवला. त्या नंबरवर कॉल करून व्हॉट्सअॅप मेसेज पाठवल्यानंतर एका महिलेने उत्तर दिले.

तक्रारदाराने महिलेला तिला भेटण्यासाठी खार पश्चिम येथील एका हॉटेलजवळ बोलावले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि बहिणीही उपस्थित होत्या.

हे एक मोठे रॅकेट

महिलेची मोडस ऑपरेंडी पाहता हे मोठे रॅकेट असल्याचे दिसून येते. जेथे कदाचित टोळीचे सदस्य त्यांच्या सोशल मीडिया पेजवरून घेतलेल्या सुंदर महिलांचे फोटो अपलोड करून लोकांना त्यांच्या वेबसाइटवर आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात.

रेश्मा यादव यांनी दावा केला की तिने ते फोटो अपलोड केले नाहीत. फोटो अपलोड केल्यानंतर प्रोफाईल लॉक करावे जेणेकरून कोणी त्याचा गैरवापर करू नये, असे पोलिसांनी सांगितले.