मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावरील सर्वात मोठा घडामोडी समोर आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादात मध्यस्थी करणार आहेत. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
कर्नाटक सीमाप्रश्नावर लवकरच दिल्लीत बैठक होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. या बैठकीला कर्नाटकचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
दोन्ही राज्यांतील सीमावादामुळे अनेक प्रकल्प प्रभावित झाले आहेत. अनेक उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. दोन्ही राज्यातील तणावपूर्ण वातावरण पाहता ही बैठक होणार आहे.